AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधून रिजेक्ट झालेलं गाणं, 4 वर्षानंतर शाहरुखच्या चित्रपटात वापरलं, ठरलं सुपरहिट

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मध्ये रिजेक्ट झालेलं गाणं. जे 4 वर्षानंतर शाहरुख-काजोल यांच्या चित्रपटात वापरण्यात आले. प्रदर्शित होताच गाण्याने रचला इतिहास.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधून रिजेक्ट झालेलं गाणं, 4 वर्षानंतर शाहरुखच्या चित्रपटात वापरलं, ठरलं सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 20, 2026 | 1:43 PM
Share

बॉलिवूडच्या इतिहासात 90 च्या दशकातील अनेक चित्रपट आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. शाहरुख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा त्यापैकीच एक लोकप्रिय चित्रपट. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. विशेष म्हणजे, या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र, या चित्रपटासाठी रेकॉर्ड केलेलं एक गाणं नंतर चित्रपटातून वगळण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, चार वर्षांनंतर हेच गाणं शाहरुख खानच्या दुसऱ्या चित्रपटातून प्रदर्शित झालं आणि प्रचंड लोकप्रिय ठरलं.

हे गाणं म्हणजे ‘तुझे याद ना मेरी आई, किसी से अब क्या कहना’. 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला जतिन-ललित यांनी संगीत दिलं असून उदित नारायण, अलका याज्ञिक आणि मन्सूर यांनी ते गायलं आहे.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’साठी आधीच रेकॉर्ड झालं होतं गाणं

मिळालेल्या माहितीनुसार, ‘तुझे याद ना मेरी आई’ हे गाणं सुरुवातीला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आलं होतं. मात्र, नंतर हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. संगीतकार ललित पंडित यांनी एका मुलाखतीत या गाण्याशी संबंधित आठवणी सांगितल्या होत्या.

जतिन-ललित यांनी हे गाणं निर्माता यश चोप्रा यांना ऐकवलं, तेव्हा तिथे उपस्थित असलेले गीतकार आनंद बक्षी भावुक झाले होते, असं सांगितलं जातं. गाण्याचे पंजाबी बोल आणि त्यातील भावनिक आशय यामुळे ते विशेष ठरलं होतं.

करण जोहर यांना गाणं आवडलं अन् ‘कुछ कुछ होता है’मध्ये मिळाली संधी

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधून वगळण्यात आलेलं हे गाणं नंतर ‘कुछ कुछ होता है’साठी वापरण्यात आलं. चित्रपटातील भावनिक प्रसंगासाठी हे गाणं योग्य ठरेल असं पामेला चोप्रा यांनी करण जोहर यांना सुचवल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. गाणं ऐकल्यानंतर करण जोहर यांना ते आवडलं आणि त्याचा चित्रपटात समावेश करण्यात आला.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल