AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरनंतर दीपिकाला आता या आजाराचं निदान; म्हणाली “मला खूप भीती..”

लिव्हर कॅन्सरनंतर आता अभिनेत्री दीपिका कक्करला पुन्हा आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. पोटात तीव्र वेदना होत असल्याने ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता नवीन आजाराविषयी तिला समजलं.

कॅन्सरनंतर दीपिकाला आता या आजाराचं निदान; म्हणाली मला खूप भीती..
दीपिका कक्कर, शोएब इब्राहिमImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 12:39 PM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर दीपिकावर सर्जरी झाली आणि ती पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगू लागली. परंतु आता दीपिकाला आरोग्याची दुसरी एक समस्या जाणवू लागली आहे. तिला पोटात अचानक इतक्या तीव्र वेदना वेदना जाणवू लागल्या, की तातडीने रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागलं. याविषयी अपडेट खुद्द दीपिकानेच व्लॉगद्वारे चाहत्यांना दिली आहे.

दीपिकाच्या पोटात गाठ (सिस्ट) झाली असून त्यावर प्रोसिजर करणं महत्त्वाचं असल्याचं, डॉक्टरांनी म्हटलंय. शोएब आणि दीपिकाने रुग्णालयातूनच हा नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. यामध्ये शोएबने सांगितलं की दोन दिवसांपासून दीपिकाच्या पोटात खूप दुखत होतं. काल वेदना अधिक तीव्र झाल्यानंतर तिला डॉक्टरांकडे आणलं. सिटी स्कॅनमध्ये समजलं की दीपिकाच्या पोटात सिस्ट झाले आहेत. या सिस्टची साइज 1.3 सेंटिमीटर आहे. दीपिकाने सांगितलं की पोटासोबतच तिचा खांदासुद्धा दुखत होता, त्यामुळे ती चिंचेत होती. सिस्टशिवाय इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं तिने स्पष्ट केलं. डिसेंबरमध्ये जेव्हा दीपिकाचा PET स्कॅन करण्यात आला, तेव्हासुद्धा रिपोर्ट्स नॉर्मलच होते.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

“दीपिकाला लिव्हर कॅन्सर झाल्यापासून एकच भीती असते की तिला पुन्हा कॅन्सर होऊ नये. डॉक्टरांनी पोटातील सिस्टवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार नाही. छोट्याच्या प्रोसिजरने ते सिस्ट बर्न केले जातील. त्यासाठी दीपिकाला तीन ते चार दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. काल आम्ही व्लॉगमध्ये हसत होतो आणि आज आम्ही पुन्हा रुग्णालयात आहोत. हेच आयुष्य आहे. परंतु आम्ही अल्लाहचे आभार मानतो की सुरुवातीच्या स्टेजमध्येच आम्हाला सिस्टबद्दल समजलं”, अशा शब्दांत शोएब व्यक्त झाला. यावेळी दीपिकासुद्धा खूप भावूक झाली होती. यावेळी तिने चाहत्यांनाही छोट्यातल्या छोट्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला  दिला आहे. तिने चाहत्यांकडे तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. या व्लॉगवर अनेकांनी कमेंट्स करत तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी धीर दिला.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस