AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामायण चित्रपटातील हे दृश्य मला प्रेक्षकांसोबत पाहायचंय, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितले कारण

रामायण हा बिगबजेट चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटातील रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्यावरुन खूपच उलटसुलट प्रतिक्रीया येत आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्यांच्या आवडत्या सीनबद्दल भाष्य केले आहे.

रामायण चित्रपटातील हे दृश्य मला प्रेक्षकांसोबत पाहायचंय, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितले कारण
ramayana cast
| Updated on: Apr 05, 2026 | 10:00 PM
Share

‘रामायण’ या महाकाव्यावर आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि नाटके आली आहे. आता पुन्हा दिग्दर्शक नितेश तिवारी ‘रामायण’ चित्रपट घेऊन आले आहे. २ एप्रिल २०२६ रोजी अभिनेता रणबीर कपूर याचा राम अवताराचा पहिला लूक जारी करण्यात आला. त्यानंतर सर्वत्र या चित्रपटावर चर्चा सुरु आहे. या चित्रपटात रणबीर सोबत साई पल्लवी, यश आणि अन्य भरगच्च स्टार कास्ट आहे. ‘दि क्लायमॅक्स इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी पौराणिक महाकाव्य रामायण चित्रपटातील त्यांचे आवडते दृश्य कोणते आहे याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले हा एक असा क्षण आहे जो माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.

दिग्दर्शकाने केला खुलासा

रामायणचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांना जेव्हा विचारले की प्रेक्षकांना कोणते दृश्य दाखवण्यासाठी ते जास्त उत्साहित आहेत. तेव्हा ते म्हणाले की मी प्रेक्षकांसोबत थिएटरमध्ये बसून हे पाहण्यास उत्सुक आहे की मी त्या भावनांना योग्य प्रकारे चित्रित केले आहे की नाही. हे दृश्य भगवान रामाच्या वनवास जाण्याचे आहे. हा एक खूप भावूक क्षण आहे. संपूर्ण शहर त्यांना निरोप देऊ इच्छीत नाही, सर्वजण त्यांच्या सोबत अश्रू ढाळत आहेत. मला वाटते की हा क्षण माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. हे एक असे दृश्य आहे जे प्रत्येक वेळी भावूक करते. रामायण दोन भागात रिलीज होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये तर सिनेमागृहात दाखल होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होईल.

ही आहे स्टारकास्ट

चित्रपटात रणबीर कपूर याने रामाची भूमिका केली आहे. तर साई पल्लवी हीने सीतेचा पात्र साकारले आहे. रवि दुबे याने लक्ष्मणाची भूमिका केली आहे. तर सनी देओल याने हनुमानाची आणि केजीएफ स्टार यश याने रावणाचा रोल केला आहे. चित्रपटात अन्य भूमिकाही मोठ्या कलाकारांनी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या नावांचा खुलासा झालेला नाही. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला असून त्यात रणबीर याच्या निवडीवरुन खुपच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे. केजीएफ फेम यश या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. पटकथा श्रीधर राघवन यांची आहे तर ऑस्कर विजेता संगितकार हंस जिमर आणि एआर रहमान यांनी संगित दिले आहे. प्राईम फोकस स्टुडिओज आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या सहयोगाने हा बिग बजेट चित्रपट तयार झाला आहे.

Follow Us
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश