मी रणबीर कपूरची चप्पल चाटू इच्छितो; ‘ॲनिमल’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण संदीपच्या याआधीच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाप्रमाणेच ‘ॲनिमल’नेही प्रेक्षकांच्या विशेष वर्गाला थिएटरकडे आकर्षित केलं आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच देशभरात 61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

मी रणबीर कपूरची चप्पल चाटू इच्छितो; ॲनिमल पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत
Ranbir Kapoor in Animal
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 06, 2023 | 10:28 AM

मुंबई : 6 डिसेंबर 2023 | अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळतेय. या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ‘ॲनिमल’ प्रत्येक दिवशी कमाईचा नवीन विक्रम रचतोय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. आतापर्यंत ‘ॲनिमल’ने जगभरात तब्बल 420 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचं भरभरून कौतुक होतंय. तर काहींनी त्यावर टीकासुद्धा केली आहे. अशातच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने रणबीर आणि संदीप यांच्याविषयी असं काही म्हटलंय, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी भारद्वाज रंगन यांच्या ब्लॉगवर त्याचा रिव्ह्यू सांगितला आहे. त्यांनी लिहिलं की बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ची दौड संपल्यावर बऱ्याच काळापर्यंत त्याचा कंटेट आणि रणबीरच्या भूमिकेवरून मोठ्या प्रमाणात भांडणं होतील. मला खरंच विश्वास आहे की हा चित्रपट आपल्या प्रामाणिकपणाने सांस्कृतिक बदल घडवू शकतो. या रिव्ह्यूमध्ये राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या एका प्री- इंटरवल सीक्वेन्सची तुलना मायकल जॅक्सनच्या ‘बीट इट’शी केली. त्याने रणबीरच्या न्यूड सीनचंही कौतुक केलं. ‘हा आणखी एक प्रतिभाशाली क्षण आहे जेव्हा विजय न्यूड होऊन चालतो आणि जल्लोष करतो’, असं ते म्हणाले.

याविषयी राम गोपाल वर्मा यांनी पुढे लिहिलं, ‘अरे संदीप वांगा, तुम्ही तुमच्या पायांचा एक फोटो पाठवा, जेणेकरून मी त्यांना स्पर्श करू शकेन. मला तुमच्या गालावर चुंबन द्यायचं आहे आणि रणबीर कपूरच्या दोन्ही पायांना मला चाटायचं आहे. असं पहिल्यांदा घडलंय की मी एक निर्माता आणि प्रेक्षक म्हणून एखादा चित्रपट पाहिल्यानंतर पूर्ण खुश आहे. मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये एखाद्या अभिनेत्याची इतकी मजबूत पकड कधीच पाहिली नव्हती. मी त्या एका सीनचंही कौतुक करेन जेव्हा तो तृप्तीला त्याची चप्पल चाटण्यास सांगतो.’