बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड फोटोशूटसाठी नेहमीच चर्चेत असते. आपल्या अदांनी ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडते. चाहतेही तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा पाऊस पाडून तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात.
दिशाने नुकतंच बिकीनीवर फोटोशूट केलं आहे. समुद्रकिनारी तिने हे फोटोशूट केलं आहे. दिशा बिकीनीवर खूपच हॉट दिसत आहे.
दिशाचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या आईने दिशाच्या फोटोचं कौतुक करत तिचा हा अंदाज आवडला असल्याचं सांगितलं आहे. काही चाहत्यांनी फोटोवर कौतुकास्पद कमेंट करत लुकबद्दल प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काही चाहत्यांना मात्र दिशाचा बोल्डनेस आवडलेला नाही. त्यांनी दिशाला चांगलंच ट्रोल केलंय.