AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार होताच Ex-Gf दिशा पटाणीने उचलले मोठे पाऊल, थेट…

Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. टायगरवर हल्ला झाल्याचे कळतच एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने मोठे पाऊल उचलले. तिने नेमकं काय केलं? वाचा...

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार होताच Ex-Gf दिशा पटाणीने उचलले मोठे पाऊल, थेट...
Tiger ShroffImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 7:56 AM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्ती अचानक आले आणि त्यांनी टायगरच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. पण त्याचा ड्रायव्हर आणि तेथील रिक्षा चालक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. टायगरवर हल्ला झाल्याचे कळताच एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने मोठे पाऊल उचलले आहे.

टायगरची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटाणीला जुहू येथे घडलेला प्रकार कळताच ती पळत टायगरच्या निवासस्थानी गेली. तिने टायगरची भेट घेतली. तसेच टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ देखील टायगला भेटायला गेली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्याच्या घरी भेट दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगरला फोन करून पाठिंबा व्यक्त केला. टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आणि दोन जण जखमी झाले. या हल्ल्यातून टायगर कसाबसा वाचला, या घटनांनंतर काही तासांतच ही भेट झाली.

दिशा आणि टायगरच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध

दिशा पटाणीचे टायगर आणि त्याच्या कुटुंबासोबत जवळचे मैत्रीचे संबंध आहेत. घटनेनंतर ती त्याच्या निवासस्थानी पोहोचताना दिसली. दिशा पटाणी अतिशय उदास दिसत होती. बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आणि फोन केले. या घटनेत टायगर घाबरला होता, तर त्याचा ड्रायव्हर गोळी लागून जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी दोषींना शोधण्यासाठी मोठी तयारी केली आहे आणि तसेच चौकशी सुरू आहे.

जॅकी श्रॉफ यांनी पुष्टी केली की मुलगा टायगर सुरक्षित आहे

या हल्ल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शकांनी चिंता व्यक्त केली आहे. रणवीर शौरी, दिग्दर्शक राहुल धोलकिया आणि पूनम पांडे यांनीही प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी कायदा-सुव्यवस्था आणि मुंबईतील लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. टायगरचे वडील अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की त्यांचा मुलगा सुरक्षित आहे.

Follow Us
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण