Drishyam 1 ते 3, विजय साळगावकरने रचलेला ‘दृश्यम’चा चक्रव्यूह!, पोलिसांना दिला चकवा, शेवटचे 20 मिनिटं आणि ‘मास्टरस्ट्रोक’
Drishyam 3 : 'दृश्यम'च्या तिन्हा भागात विजय साळगावकरने पोलिसांना वेड्यांसारखं पळवलं. अभिनेत्याने कसा रचला 'दृश्यम'चा चक्रव्यूह आणि कोणता प्लान ठरला 'मास्टरस्ट्रोक', घ्या जाणून सर्वकाही...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम’ सिनेमाच्या तिन्ही भागात एक गोष्ट सारखीच आहे आणि ती म्हणजे विजय साळगावकर याची चालाकी आणि त्याने रचलेली कथा… विजय कोणता मोठा अपराधी नाही. पण कुटुंबियांनी वाचवण्यासाठी तो मोठा रणनीती तयार करतो आणि ‘दृश्यम’चा चक्रव्यूह रचतो. याामुळे पोलिसांचं सत्यापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं. आणि दृश्यम 3 ची चर्चा सुरु आहे. पण त्या आधी पहिले दोन भाग समजून घेणं फार महत्त्वाचं आहे… त्यामध्ये कळतं विजय याने पोलिसांना कसा चकवा दिला.
दृश्यम – 1 : घटनेनंतर सुरु झाला विजयचा खेळ
– सिनेमाच्या पहिल्या भागात साळगावकर याची लेक अंजू हिच्या हातून सॅम नावाच्या एका तरुणाची हत्या होते. ही घटना अचानक घडते आणि विजय याला कळून चूकतं की, पोलिसांच्या जाळ्यात आलो की, कुटुंबियांवर मोठं संकट ओढावेल.
– त्यानंतर विजय कुटुंबियांना वाचवण्यासाठी मोठी योजना तयार करतो. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकाच टाईमलाईननुसार, घटनेला लक्षात ठेवतात.
– वियज कुटुंबियांना सिनेमे दाखवत आणि अनेक गोष्टी समजावत पोलिसांना कसं सामोरं जायचं ते सांगतो…
– विजय आपल्या कुटुंबासह सिनेमा पाहण्यासाठी, यात्रेसाठी आणि इतर गोष्टींची अशी खोटी कथा तयार करतो, ज्यामुळे पोलिसांना हा विश्वास वाटेल की, घटनेच्या वेळी ते सर्वजण दुसऱ्याच कुठेतरी उपस्थित होते.
– पोलिस अधिकारी मीरा देशमुखांना विजयवर संशय येतो. त्या सतत कुटुंबाची चौकशी करतात आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु विजयने रचलेली ती कथा आणि कुटुंबाची एकसारखीच साक्ष पोलिसांसाठी एक मोठं आव्हान ठरते. अशात पहिल्या भागात कुटुंबियांना वाचवण्यासाठी विजय यशस्वी ठरतो.
‘दृश्यम 2’ : विजय याची खरी परीक्षा
– दुसऱ्या भागात कथा आणखी रंजक होते. विजय त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत असतो आणि सिनेमा बनवण्याच्या विचारात असतो. पण पोलीस जुनं प्रकरण विसरलेले नसतात.
– यावेळी पोलीस चौकशी अधीक कसून करतात. पोलीस संबंधित प्रकरण पुढे करतात आणि विजय याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात.
– विजय देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी पूर्ण तयारी करतो. नवीन पुरावे आणि पोलीस तपासा दरम्यान ताण वाढलेला असतो.
– या सिनेमाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे विजय केवळ जुन्या योजनेवरच अवलंबून राहत नाही, तर बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलतो. अशात दुसऱ्या भागात देखील विजय पोलिसांच्या हाती लागत नाही आणि याप्रकरणातून त्याची सुटका होते.
दृश्यम 3 द कन्क्लूजन: शेवटच्या 20 मिनिटांमध्ये होतं तरी काय?
दृश्यम 3 च्या क्लायमेक्समध्ये विजय साळगावकर पुन्हा पोलिसांना चकवा देतो. सिनेमाच्या शेवटच्या भागात केस कोर्टात पोहोचते आणि पोलिसांना असं वाटतं की, विजय याच्या विरोधात पूर्ण पुरावे आहेत.
– कोर्टात रघुनायक विजय याच्या विरोधात सक्षा देतो, 23 जुलै च्या रात्री विजय मेडिकलल कॉलेजमध्ये असल्याचा आणि काही वेळ कॉलेज असल्याचा रघुनायक दावा करतो. तर नंदिनी हिचं असं म्हणणं असतं की, विजय रात्री जवळपास 10 वाजता घरी आलेला.
– पोलिस हा दावा खोडून काढण्यासाठी सलगावकर कुटुंबाची जुनी रेकॉर्डिंग कोर्टा सादर करतात. सुरुवातीला ती रेकॉर्डिंग विजयसाठी अडचणीची ठरू लागते, कारण त्यातील कुटुंबाच्या संभाषणावरून असं वाटतं की विजय त्या वेळी घरी उपस्थित नव्हता.
– परंतु नंतर त्या रेकॉर्डिंगचा पुढचा भाग वाजवला जातो. साधारण 10.30 वाजता विजय घरामध्ये प्रवेश करताना ऐकू येतो. तो कुटुंबाशी बोलतो, जेवणाची मागणी करतो आणि कुटुंबासोबत बसतो.
– यामुळे पोलिसांच्या टाइमलाइनवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जर रेकॉर्डिंग खरी असेल, तर विजय त्या वेळी मेडिकल कॉलेजमध्ये कसा असू शकला असता? इथच विजयचा शेवटचा मोठा डाव कामी येतो आणि पोलीस पुन्हा मोठ्या अडचणीत येतात. तिसऱ्या भागात देखील विजय साळगावकर पोलिसांच्या एक पाऊल पुढे राहतो. अशा रंजक कथेमुळेच सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठी गर्दी होत आहे.
