AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: त्याबाबतीत माझा नवरा कधीच मस्करी..; ‘दृश्यम 3’च्या दिग्दर्शकाच्या पत्नीची भावूक पोस्ट

Drishyam 3: ‘दृश्यम 3’ हा हिंदी फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम भाग असल्याचं अभिषेक पाठकने स्पष्ट केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Drishyam 3: त्याबाबतीत माझा नवरा कधीच मस्करी..; 'दृश्यम 3'च्या दिग्दर्शकाच्या पत्नीची भावूक पोस्ट
अभिषेक पाठक, शिवालिका ओबेरॉय, अजय देवगणImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2026 | 3:35 PM
Share

Drishyam 3: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ची आज, 2 ऑक्टोबरला सिनेमागृहात एण्ट्री झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिषेक पाठकची पत्नी आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय हिने पतीसाठी लिहिलेली भावनिक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत, केलेले कष्ट आणि जागून काढलेल्या रात्री आपण जवळून पाहिल्याचं शिवालिकाने म्हटलं आहे. शिवालिकाने सोशल मीडियावर ‘दृश्यम 3’च्या सेटवरील काही बिहाईंड द सीन्सचे फोटो शेअर करत अभिषेकसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या प्रोजेक्टमागचं त्याचं स्वप्न, मेहनत आणि अनेक जागलेल्या रात्री आपण पाहिल्या आहेत, असं तिने सांगितलं. आता त्याने इतक्या मेहनतीने तयार केलेली गोष्ट प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

शिवालिकाच्या पोस्टमध्ये चित्रपटापेक्षा अभिषेकच्या प्रवासाविषयीची भावना अधिक दिसून आली. पतीने एका मोठ्या फ्रँचायझीचा तिसरा भाग तयार करताना घेतलेले कष्ट तिनेनी जवळून अनुभवले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजचा क्षण तिच्यासाठीही भावनिक ठरला आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीची कथा कुटुंबाभोवती फिरते. विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याभोवती या मालिकेतील रहस्य आणि थरार उभा राहतो. त्यामुळे शिवालिकानेही तिच्या पोस्टमध्ये कुटुंबाचा उल्लेख केला आहे.

विशेष म्हणजे अभिषेक पाठकनेही काही दिवसांपूर्वी या 12 वर्षांच्या प्रवासाला वैयक्तिक आयुष्याशी जोडलं होतं. पहिल्या भागाच्या वेळी तो 27 वर्षांचा होता. दुसऱ्या भागाच्या काळात त्याचं शिवालिकासोबत लग्न झालं, तर तिसऱ्या भागाच्या प्रवासात तो वडील झाला. त्यामुळे ‘दृश्यम’ फ्रँचायझी त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांची साक्षीदार ठरली आहे.

‘मी हे स्वप्न, त्यामागची मेहनत, जागून काढलेल्या असंख्य रात्री आणि या संपूर्ण प्रवासामागचं मनापासूनचं समर्पण पाहिलं आहे. ज्या गोष्टीची साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, ती संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्ही ‘दृश्यम’ पाहिलं असेल, तर तुम्हाला आधीच माहीत आहे… जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो, तेव्हा माझा पती कधीच मस्करी करत नाही,’ अशी पोस्ट शिवालिकाने लिहिली आहे. अभिषेकने यापूर्वी चित्रपटाच्या निर्मितीचा अनुभव सांगताना शिवालिकाचंही कौतुक केलं होतं. ‘दृश्यम 3’चं काम अत्यंत तीव्र आणि आव्हानात्मक होतं. अशा काळात शिवालिकाने त्यांला शांत राहण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी मदत केली, असं त्याने सांगितलं.

Follow Us
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...