AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: शानदार क्लायमॅक्सने जिंकली बाजी, पण ‘दृश्यम 3’मध्ये या 5 उणिवा

Drishyam: The Conclusion: 'दृश्यम 3' मध्ये विजय साळगांवकरचा चलाखपणा पुन्हा दिसला, पण स्क्रीनप्ले आणि वेगाशी निगडीत काही मुद्यांवर आणखी काम केलं असतं तर हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि उत्तम थ्रिलर बनला असता.

Drishyam 3: शानदार क्लायमॅक्सने जिंकली बाजी, पण ‘दृश्यम 3’मध्ये या 5 उणिवा
| Updated on: Oct 02, 2026 | 8:58 PM
Share

Drishyam: The Conclusion : भारतीय सिनेमाच्या इतिहासात जेव्हा सस्पेन्स, कौटुंबिक नाट्य आणि माईंड गेम्सचा विषय निघतो, तेव्हा विजय साळगावकरचं नाव नक्कीच अग्रक्रमाने घेतलं जाईल. ‘दृश्यम’ फ्रँचायझीने प्रेक्षकांना केवळ थरार दिला नाही, तर प्रत्येक प्रसंगाकडे बारकाईने पाहायला आणि पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ शोधायला भाग पाडलं. ‘दृश्यम 3’च्या थिएटर रिलीजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. विशेषतः चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर नेतो आणि थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. मात्र, संपूर्ण फ्रँचायझीकडे पाहिलं तर असं म्हणावं लागेल की हा चित्रपट ‘ऑल-टाइम क्लासिक’ होण्यापासून अगदी एक पाऊल दूर राहिला.

मेकर्सनी काही गोष्टींवर थोडं अधिक काम केलं असतं, तर ‘दृश्यम 3’ थ्रिलर जॉनरमधील एक मैलाचा दगड ठरू शकला असता.

1. पहिल्या हाफचा सुस्तपणा

‘दृश्यम’ मालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणारी अनामिक भीती आणि बेचैनी. मात्र, ‘दृश्यम 3’मध्ये ही पकड काहीशी सैल पडल्यासारखी वाटते. पहिल्या हाफमध्ये कथा पुन्हा उभी करण्यासाठी आणि साळगावकर कुटुंबाच्या जुन्या भीतीची आठवण करून देण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे इंटरव्हलपूर्वीचा वेग काहीसा कमी झाल्याचं दिसून आलं. जर पहिल्या हाफचं एडिटिंग थोडं अधिक टाईट केलं असतं तर पहिल्या काही मिनिटांपासूनच प्रेक्षकांना सीटवर खिळवून ठेवणारा ताण निर्माण झाला असता.

2. पोलीस तपासात नावीन्याची कमतरता

विजय साळगावकर नेहमी पोलीस प्रशासनापेक्षा दोन पाऊल पुढे विचार करतो, आणि हीच या फ्रँचायझीचा खरी मजा आहे. मात्र, यावेळी तपासाची पद्धत काहीशी परिचित वाटते. साक्षीदारांची चौकशी, फोन रेकॉर्ड्स, कॉल डिटेल्स आणि पारंपरिक तपासाच्या पद्धती यामुळे पोलिसांकडून येणारा धोका फारसा अनपेक्षित वाटत नाही. तपास यंत्रणेकडून एखादी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित युक्ती किंवा पूर्णपणे अनपेक्षित तपासपद्धत समोर आली असती, तर विजय आणि सिस्टममधील संघर्ष आणखी रोमांचक झाला असता.

3. सपोर्टिंग कलाकारांचं काम ठीकठाक

पहिल्या आणि दुसऱ्या भागात नंदिनी (पत्नी) आणि मुलींचा मानसिक ताण, यला कथेत महत्वाचं स्थान होतं. त्यांची भीती, अस्वस्थता आणि परिस्थितीशी झुंज हा ‘दृश्यम’च्या भावनिक बाजूचा महत्त्वाचा भाग होता. तिसऱ्या भागात मात्र कुटुंबातील काही पात्रं तुलनेने पार्श्वभूमीत जातात. त्यांचं काम अनेकदा केवळ प्रतिक्रिया देण्यापुरतं किंवा भावनिक प्रसंगांपुरतं मर्यादित राहतं. कुटुंबातील एखाद्या सदस्याने स्वतःहून एखादं पाऊल उचललं असतं, एखादी चूक केली असती किंवा अनावधानाने असा क्लू सोडला असता ज्यामुळे विजयची संपूर्ण योजना धोक्यात आली असती, तर कथेला अधिक वास्तववादी आणि नाट्यमय खोली मिळाली असती.

4. ‘दृश्यम 2’ च्या नॉस्टॅल्जियावर खूप भर

तिसऱ्या भागात मागील चित्रपटाच्या आठवणी आणि त्याच फॉर्म्युलाचा वापर खूप ठिकाणी दिसतो. नोस्टॅल्जिया नक्कीच जुन्या चाहत्यांसाठी आकर्षण ठरतो; मात्र, ज्यांनी आधीचे भाग पाहिलेत, त्या प्रेक्षकांना तर विजय साळगावकरच्या विचार करण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे काही ट्विस्टचा अंदाज आधीच लावता येऊ शकतो. कथेने जुन्या टेम्पलेटपासून थोडं दूर जाऊन काही धाडसी आणि अनपेक्षित सब-प्लॉट्स आणले असते, तर चित्रपटाची शॉक व्हॅल्यू आणि सस्पेन्स आणखी प्रभावी ठरला असतीय

5. सगळा थ्रिलचा भार फक्त शेवटच्या 20 मिनिटांवर

संपूर्ण चित्रपटाचा सर्वात जोरदार आणि धक्का देणारा भाग हा शेवटचा 25 ते 30 मिनिटांचा भाग आहे. क्लायमॅक्स नक्कीच मास्टरक्लास आहे, पण एका उत्तम थ्रिलरची खरी ताकद केवळ शेवटच्या ट्विस्टमध्ये नसते. संपूर्ण प्रवासात ठराविक अंतराने प्रेक्षकांना नवे प्रश्न, नवे संकेत आणि नवे धक्के मिळत राहणं गरजेचं असतं. ‘दृश्यम 3’मध्ये मध्यंतरानंतर काही भाग तुलनेने शांत आहे आणि त्यामुळे शेवटच्या ट्विस्टवर थ्रिलचा मोठा भार येतो. हा सस्पेन्स आणि पेसिंग संपूर्ण चित्रपटात अधिक समान पद्धतीने पसरवला असता, तर अनुभव आणखी प्रभावी झाला असता.

‘दृश्यम 3’ला आजही बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. विजय साळगांवकरचा चलाखपणा अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून घेतोय, पण वरच्या मुद्यावर अजून काम केलं असतं तर हा चित्रपट इतिहासतला सर्वात शानदार थ्रिलर बनला असता.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा