AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची जोरदार कमाई; बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम! 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री?

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या 'दृश्यम 3' चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. आा चित्रपटाने जागतिक पातळीवर 500 कोटींचा आकडा पार केला असून 5 चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची जोरदार कमाई; बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम! 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री?
| Updated on: Oct 13, 2026 | 2:25 PM
Share

Drishyam 3 Box Office : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या खिशात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. ज्यापैकी काहींवर अद्याप काम सुरू आहे, तर काही लवकरच रिलीज होतील. मात्र ‘दृश्यम 3’ ने संपूर्ण माहौल सेट केलाय. या चित्रपटाला तर पहिल्या दिवसापासूनच शानदार रिस्पॉन्स मिळतोय. याचदरम्यान मेकर्सनी एक मोठी अपडेट शेअर केली आहे. ज्यानुसार, ‘दृश्यम 3’ ची घोडदौड जोरात सुरू असून या चित्रपटाने जगभरात, 12 व्या दिवशी 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. नुकतीच स्टार स्टुडिओच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या यशासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आलं. या पोस्टमध्ये, “A blockbuster conclusion, Winning hearts, breaking records. Thank you and keep the love pouring in!” असे लिहिण्यात आले आहे. या पोस्टद्वारे निर्मात्यांनी प्रेक्षकांचे आभार मानत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीचा आनंद व्यक्त केला आहे.

पोस्टरवर चित्रपटाच्या यशाचा उल्लेख करत प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. या अपडेटनुसार, चित्रपटाच्या जगभरातील ग्रॉस कलेक्शनने 500 कोटींचा टप्पा ओलांडल्याचे सांगितले जात आहे.

11 व्या दिवशी ‘दृश्यम 3’ने किती कमाई केली?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या सोमवारीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. 11 व्या दिवशी चित्रपटाने सुमारे 6.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी चित्रपटाचे एकूण 13,605 शो आयोजित करण्यात आल्याचा उल्लेखही आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाचे भारतातील ग्रॉस कलेक्शन 378.24 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर नेट कलेक्शन सुमारे 315.25 कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीत आणि निर्मात्यांनी शेअर केलेल्या जगभरातील कलेक्शनमध्ये फरक असल्याचे दिसते. त्यामुळे भारतातील नेट कमाई, देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन आणि जगभरातील ग्रॉस कलेक्शन यांची तुलना करताना हे आकडे स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक आहे.

परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, परदेशातून एका दिवसात सुमारे 2.50 कोटी रुपयांची कमाई झाली असून, एकूण ओव्हरसीज कलेक्शन 111 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांतील कमाईचे आकडेही चर्चेत आहेत. उपलब्ध रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 62 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 53 कोटी, तिसऱ्या दिवशी 61 कोटी आणि चौथ्या दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जातं.

या 5 चित्रपटांना दिली मात !

बॉक्स ऑफिसवरील दैनंदिन कमाईच्या तुलनेत ‘दृश्यम 3’ची कामगिरी चर्चेत आली आहे. अकराव्या दिवसाच्या कलेक्शनच्या संदर्भात काही लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांची नावेही समोर आली आहेत. या यादीत ‘3 इडियट्स’, ‘सिम्बा’, ‘टोटल धमाल’, ‘वॉर 2’ आणि ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘3 इडियट्स’ने 6.19 कोटी, ‘सिम्बा’ने 6.16 कोटी आणि ‘टोटल धमाल’ने 6.03 कोटी रुपयांची कमाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘वॉर 2’साठी 6.25 कोटी रुपयांचा आकडा देण्यात आला आहे. एकंदरीत, ‘दृश्यम 3’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत मोठे दावे केले जात असून, अजय देवगणच्या या चित्रपटाची कमाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल