Drishyam 3 box office: पहिल्याच दिवशी ‘दृश्यम ३’ने रचला इतिहास! काय आहे सिनेमाची कथा? वाचा
Drishyam 3 box office: गेल्या काही दिवसांपासून दृश्यम 3ची क्रेझ पाहायला मिळत होती. अनेकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात होते. आता या चित्रपटाच्या कमाईने पहिल्या दिवशीच इतिहास रचला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या चित्रपटाचा ‘दृश्यम द कन्क्लूजन’चा रिलीजपूर्वीच खूप बोलबाला पाहायला मिळाला. खरेतर ब्लॉकबस्टर फ्रँचायझीचा शेवटचा भाग असल्यामुळे या चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे चित्रपटाची रेकॉर्ड तोडणारी ऍडव्हान्स बुकिंग झाली होती. त्याचबरोबर या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे धुमधडाक्यात ओपनिंग केले आहे आणि अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. या सिनेमामुळे इतर चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर ठकलण्यात आले.
‘दृश्यम द कन्क्लूजन’ किंवा ‘दृश्यम ३’ २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. आणि चित्रपटाच्या प्रचंड हाइपमुळे त्याला थिएटरमध्ये पहिल्या दिवशी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित दृश्यम फ्रँचायझीच्या या तिसऱ्या भागाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर तर चित्रपटाच्या डायलॉग्जपासून ते त्याच्या क्लायमॅक्सपर्यंत आणि स्टार कास्टच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा होत आहे. त्याचबरोबर ‘दृश्यम द कन्क्लूजन’ किंवा ‘दृश्यम ३’ने ओपनिंग डेवर बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार ‘दृश्यम ३’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ६६.७५ कोटींची ओपनिंग केली आहे. मात्र हे प्रारंभिक आकडे आहेत. अधिकृत डेटा आल्यानंतर त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
‘दृश्यम ३’ बॉलिवूडचा ५वा सर्वात मोठा चित्रपट ठरला
‘दृश्यम ३’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ धुमधडाक्यात कमाई केली नाही तर अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. सांगायचे तर हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. इतकेच नाही तर ओपनिंग डेवर सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा ५वा चित्रपटही ठरला आहे. याने शाहरुख खानपासून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटांच्या ओपनिंग डे कमाईचेही रेकॉर्ड मोडले आहेत.
भारतातील टॉप १० ओपनिंग चित्रपट
धुरंधर २ – १४५ कोटी
आदिपुरुष – ८६.७५ कोटी
जवान – ७५ कोटी
दृश्यम ३ – ६६.७५ कोटी
स्त्री २ – ६४.८ कोटी
अॅनिमल – ६३.८ कोटी
पठाण – ५७ कोटी
वॉर – ५३.३५ कोटी
वॉर २ – ५२.५ कोटी
ठग्स ऑफ हिंदोस्तान – ५२.२५ कोटी
दृश्यम 3ची क्रेझ पाहाता आयुषमान खुरानाचा टली उडता तीर या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर ठकलण्यात आले आहे.
