AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: केवळ विनोदी काहीतरी करायचं म्हणून.., ‘दृश्यम 3’बद्दल योगेश सोमण स्पष्टच बोलले, व्यक्त केली मोठी खंत

Drishyam 3: 'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सोमण यांनी तिसऱ्या भागाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. या चित्रपटातील एक गोष्ट मात्र खटकल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Drishyam 3: केवळ विनोदी काहीतरी करायचं म्हणून.., 'दृश्यम 3'बद्दल योगेश सोमण स्पष्टच बोलले, व्यक्त केली मोठी खंत
'दृश्यम 3'बद्दल काय म्हणाले योगेश सोमण?Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2026 | 9:29 AM
Share

Drishyam 3: ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि उत्कंठेचा वेगळाच अनुभव दिला. या दोन्ही चित्रपटांमध्ये मराठमोळे अभिनेते योगेश सोमण यांनी इन्स्पेक्टर विनायक सावंतची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘दृश्यम 3’मध्ये ते दिसणार का, याची चाहत्यांनाही उत्सुकता होती. मात्र तिसऱ्या भागात योगेश सोमण दिसले नाहीत. आता त्यांनी स्वतः ‘दृश्यम 3’ पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दल आपले स्पष्ट मत मांडलं आहे. योगेश सोमण यांनी सांगितलं की, ३ ऑक्टोबरला गोव्यात असताना त्यांनी ‘दृश्यम 3’ पाहिला. या चित्रपटाच्या आधीच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता म्हणून सहभागी झाल्यामुळे तिसरा भाग पाहण्याची त्यांना विशेष उत्सुकता होती. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर एक खंतही त्यांच्या मनात राहिली.

आपण या भागाचा हिस्सा नाही, याचं थोडं वाईट वाटल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी चित्रपटाचं कौतुकही केलं. त्यांच्या मते, ‘दृश्यम 3’ची कथा अतिशय वेगाने पुढे जाते. प्रेक्षकांना फारसा विचार करण्यासाठी वेळ न देता कथानकातील गुंतागुंत सातत्याने वाढत जाते आणि त्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षक त्यात गुंतून राहतो.

जयदीप अहलावतच्या अभिनयाचे कौतुक

अभिनयाबाबत बोलताना योगेश सोमण यांनी जयदीप अहलावतच्या कामाचं विशेष कौतुक केलं. त्यांच्या मते, जयदीपने आपल्या प्रत्येक प्रसंगावर ठसा उमटवला आहे. त्याची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने समोर येते, ती प्रभावी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अजय देवगणच्या अभिनयाबाबतही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. अजय फारसं काही न बोलता केवळ शांतपणे दिलेल्या रिॲक्शनमधून प्रसंगावर प्रभाव निर्माण करतो, असं सोमण म्हणाले. इतर कलाकारांनीही चांगलं काम केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पहा व्हिडीओ-

“मला थोडं वाईट वाटलं, की आपण या भागामध्ये नाही. कारण सिनेमा खूप चांगला केलेला आहे. खूप वेगाने कथा पुढे सरकत जाते. आपल्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही. इतक्या छान पद्धतीने गुंतागुंत वाढवत तो सिनेमा पुढे नेला आहे. आपण ते एंजॉय करतो. अभिनयाची बाजू पाहता, जयदीप अहलावत हा नंबर १ वर आहे. एका अर्थी त्याने स्वाईप करून टाकलंय त्याच्या सगळ्या प्रसंगांमध्ये.. तो खूप छान पद्धतीने आपल्यासमोर येतो. काहीही न बोलता, जेवढ्या शांतपणे केवळ रिअॅक्शनने बाजी मारून नेतात ते म्हणजे अजय देवगण. बाकीच्या सगळ्या कलाकारांनी छान काम केलंय,” असं ते म्हणाले.

‘गायतोंडे’च्या व्यक्तिरेखेवर खंत

मात्र चित्रपटातील एका व्यक्तिरेखेबाबत योगेश सोमण यांना खंत वाटली. त्यांनी ‘गायतोंडे’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या कामाचं कौतुक करताना व्यक्तिरेखेच्या मांडणीवर प्रश्न उपस्थित केला. “फक्त मला चांगलं काम करूनही कॅरेक्टरमध्ये मार खाल्लीये ती आमच्या गायतोंडेनं. तो किती छान काम करतो हे आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिलंय. पण केवळ विनोदी काहीतरी करायचं, असं बहुधा त्याला सांगितलं असावं दिग्दर्शकांनी.. मला माहीत नाही. कारण तो दिग्दर्शकांनी सांगेल त्याप्रमाणे काम करणारा माणूस आहे. ते त्याने चांगलंच केलंय. पण त्या कॅरेक्टरची मजाच गेलीये. जी दहशत पार्ट १ मध्ये होती, ती दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये.. केवळ ते कॅरेक्टर विनोदी करायची म्हणून केल्यामुळे, त्याची मजा राहिली नाही,” असं ते पुढे म्हणाले.

अखेर काही खटकणाऱ्या गोष्टी असूनही ‘दृश्यम 3’ नक्की पाहावा, असे आवाहन योगेश सोमण यांनी केलं. गुंतवून ठेवणारं कथानक आणि वेगाने पुढे जाणारी कथा हे चित्रपटाचे महत्त्वाचे पैलू असल्याचं त्यांनी सांगितले.

Follow Us
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा