Drishyam : मी खूप घाबरलेले, मृणालनं सांगितला ‘दृश्यम’ सिनेमातील त्या सीनच्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली, खऱ्या आई -बाबांना…

अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटातील अनुच्या भूमिकेने मृणाल जाधवला घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली. पोलिस चौकशीच्या सीनदरम्यान नेमकं काय घडलं, याचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला.

Drishyam : मी खूप घाबरलेले, मृणालनं सांगितला दृश्यम सिनेमातील त्या सीनच्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली,  खऱ्या आई -बाबांना...
| Updated on: Oct 25, 2026 | 10:24 PM

‘दृश्यम’ चित्रपट आठवला की विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची ती भयानक गोष्ट डोळ्यासमोर येते. चित्रपटात अजय देवगणने विजय ही भूमिका साकारली होती. तर मृणाल जाधवने त्याच्या लहान मुलीची म्हणजेच अनुची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील काही प्रसंग असे शूट करण्यात आले होते की बघणाऱ्याही घाबरल्याशिवाय राहणार नाही. तर काही प्रसंगावेळी प्रेक्षक भावूकही झाले. पण मृणालने केलेला तो एक सीन सर्वांच्याच लक्षात राहिला.

मृणालने या सिनेमात विजय साळगावकराच्या मुलीची म्हणजेच अनुची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तो पोलिस चौकशीचा सीन प्रेक्षकांच्या अंगावर काटे आणणारा होता. खास करून जेव्हा इन्सपेक्टर गायतोंडेची नजर जेव्हा बारक्या अनुवर जाते तेव्हाचा सीन. तो सीन सर्वत्र गाजला आणि मृणालच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

Loading...

 

लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत मृणालने या सीनचा खुलासा केला आहे . तो सीन कसा शूट केला? दिग्दर्शकांनी तिला काय सांगितले हे सगळं तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. मृणालने सांगितले की पोलिस स्टेशनच्या त्या सीनमध्ये जेव्हा क्रूर पोलिस इन्सपेक्टर गायतोंडे साळगावकर कुटुंबाला बेदम मारहाण करतो आणि अनुला मारायला जातो. तेव्हा मृणाल प्रचंड घाबरली होती. असे मृणालने सांगितले.

 


 

मृणाल पुढे म्हणाली की ‘तेव्हा मी खूपच लहान होते. त्यामुळे त्या सीनच्या वेळी आत मारत आहेत ते खरचं मारतात की काय असं तिला वाटले. या विचाराने ती आणखीनच घाबरली. सेटवर इतकं भीतीदायक वातावरण झालं होतं की तिला रडू कोसळलं होतं. असे मृणाल म्हणाली. यानंतर दिग्दर्शक निशिकांत कामत सरांनी तिला बाजूला नेऊन समजावले असे मृणालने सांगितले, त्यांनी तिला सांगितले की “तुझ्या खऱ्या आई -बाबांना कोणी मारलं असतं तर तुला काय वाटलं असतं” हे तू फिल कर त्याशिवाय तुला हे जमणार नाही. असे मृणाल लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

‘दृश्यम’ मधील अनुच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. विशेष म्हणजे, तिने सुरूवातीला बजरंगी भाईजानमधील मुन्नीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. पण त्यात तिचे सिलेक्शन झाले नाही आणि तिला दृश्यमची संधी मिळाली

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us