भारती सिंहच्या घरी संशयित वस्तू सापडली, NCB चे अधिकारी भारती आणि हर्षची कार्यालयात चौकशी करणार!

या धाडसत्रादरम्यान भारतीच्या घरी ड्रग्स स्वरूपची वस्तू सापडली आहे. ते नक्की काय आहे, याचा खुलासा अद्याप एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेला नाही.

भारती सिंहच्या घरी संशयित वस्तू सापडली, NCB चे अधिकारी भारती आणि हर्षची कार्यालयात चौकशी करणार!

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन (Drugs case) प्रकरणी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर आज सकाळी (21 नोव्हेंबर) धाड टाकली होती. भारतीच्या घरावरील ही कारवाई नुकतीच संपली आहे. या धाडसत्रादरम्यान भारतीच्या घरी ड्रग्स स्वरूपची वस्तू सापडली आहे. ते नक्की काय आहे, याचा खुलासा अद्याप एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेला नाही. त्या ठिकाणी सापडलेल्या वस्तू घेऊन एनसीबी अधिकारी अंधेरीहून बेलार्ड पियर स्थित एनसीबी कार्यलयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया (Harsh Limbachiyaa) याला एनसीबीने ताब्यात घेतले असून,त्यांची चौकशी करण्यात येणार आहे (Drugs Case NCB summons comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa).

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात  कॉमेडियन भारती सिंह  आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीया यांना एनसीबीने समन्स बजावले होते. यानंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली होती.

(Drugs Case NCB summons comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa)

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला होता (Drugs Case NCB summons comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa).

या आधी अर्जुन रामपालच्या घरावर धाड

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावण्यात आले होते. अर्जुनसह त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीची देखील चौकशी करण्यात आली होती Drugs Case NCB summons comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa

निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

8 नोव्हेंबर रोजी सकाळी निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले गेले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांची देखील चौकशी करण्यात आली होती.

(Drugs Case NCB summons comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *