महाराष्ट्र, कर्नाटकासह ‘या’ राज्यात चोऱ्या करायचा, गावात मोठा बंगला बांधला; अखेर कल्याण पोलिसांनी…

कोण कशासाठी चोरी करेल हे सांगता येत नाही. एका व्यक्तीने शंभरहून अधिक चोऱ्या केल्या. त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. देशातील अर्धा डझन राज्यात त्याने चोऱ्या केल्या होत्या. त्याच्या मागावर पोलीस होते. अखेर त्याला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. पण त्याची कसून चौकशीही केली. तेव्हा त्याने चोरी करण्याचं दिलेलं कारण ऐकून पोलीसही थक्क झाले.

महाराष्ट्र, कर्नाटकासह 'या' राज्यात चोऱ्या करायचा, गावात मोठा बंगला बांधला; अखेर कल्याण पोलिसांनी...
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 12:45 PM

आजपर्यंत पाहिला नसेल अशा चोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, कर्नाटकात चोऱ्या करून पसार होणाऱ्या या चोराच्या मागावर अर्धा डझन राज्यातील पोलीस होती. गुजरात पोलिसांच्या तावडीतूनही तो निसटला होता. पण अखेर या चोराला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर देशभरात शंभरहून अधिक चोऱ्या करणाऱ्या या चोरट्याने गावात भला मोठा बंगला बांधला होता. त्याच्या संपत्तीचा आकडा ऐकून खुद्द पोलीसही चक्रावून गेले आहेत.

गावामध्ये आपला रुबाब दाखवण्यासाठी मोठा बंगला बांधण्याकरिता देशभरात शंभरहून अधिक चोऱ्या करणाऱ्या सराई चोट्याला कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामविलास गुप्ता असे या चोरट्याचे नाव असून हा हा चोरटा काही दिवसा पूर्वी गुजरात पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. या चोरट्याच्या शोधात सहा राज्याचे पोलिस होते. मात्र तो कल्याण नजीक एका ढाब्यावर बसल्याची माहिती मिळताच कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसानी अवघ्या 12 मिनिटात त्या ढाब्यावर पोहचत सापळा रचून त्याला जेरबंद केलं. रामविलास गुप्ताला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधल्याचं त्याने सांगितलं. कल्याण पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असून त्याला गुजरात पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

10 एप्रिल रोजी गुजरात पोलीस रामविलास गुप्ताला ठाण्यात एका तपासानिमित्ताने घेऊन आले होते. मात्र, गुजरात पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्यात रामविलास यशस्वी झाला होता. रामविलास गुप्ता हा कुख्यात चोरटा आहे. उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याने देशभरात चोरीचे गुन्हे केले आहेत. शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली आंध्र प्रदेश या राज्यात त्याने चोऱ्या केल्या असून त्याच्यावर या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. एवढा मोठा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने त्याच्या शोधात अनेक पोलिस पथके काम करत होते.

कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांना हा आरोपी कल्याण कोळसेवाडी परिसरातील एका ढाब्यावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक कल्याणनजीक म्हारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहचले. रामविलास त्याठिकाणी कोणाच्या तरी प्रतिक्षेत बसला होता. रामविलास परत पसार होऊ नये यासाठी पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला घेरले आणि चारी बाजूने त्याच्यावर झडप घालत त्याला पकडले. त्याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधला आहे. त्याच्याकडे ढिगभर दुचाकी आणि चार चाकी गाड्या आहेत. इतका मोठा चोरटा पकडला गेल्याने पोलिासांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.