नकली शिष्य, आनंद दिघेंनी सांगूनही राजीनामा… मुख्यमंत्री शिंदेंचे राजन विचारेंवर गंभीर आरोप

'चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता. तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला आणि म्हणाला, हे काय चालू आहे?', शिंदेंनी नेमका काय केला गौप्यस्फोट?

नकली शिष्य, आनंद दिघेंनी सांगूनही राजीनामा... मुख्यमंत्री शिंदेंचे राजन विचारेंवर गंभीर आरोप
| Updated on: May 06, 2024 | 3:23 PM

राजन विचारे हे आनंद दिघे यांचे नकली शिष्य आहेत. आनंद दिघे यांनी राजन विचारे यांना सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नाही. तर धर्मवीर या चित्रपटात राजन विचारे यांच्याबद्दल जे काही दाखवलं आहे, ते खोटं असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धर्मवीर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल, असेही म्हणत एकनाथ शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता. तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला आणि म्हणाला, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेतायत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल. तू बिलकुल इथे तिथे काही बोलू नकोस. पण तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं की असं करू नका. तेव्हा साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्या भाषेत आनंदाश्रमामधील आतल्या खोलीमध्ये समजावलं. हे करायला लागलं. आम्ही सिनेमात जे दाखवलं ते एवढं उलटं आणि एकदम चांगलं दाखवलं. पण तो चांगला नाही, असं म्हणत शिंदेंनी हा मोठा गौप्यस्फोट केला.

Follow us
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.