नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल; ठाकरे गटाचं प्रत्युत्तर काय?
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. उद्धव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेत असताना राज्यातील उद्योगधंदे बाहेर गेले कसे? असा सवाल राज ठाकरेंनी केला. बघा स्पेशल रिपोर्ट काय केला ठाकरेंवर हल्लाबोल?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर कणकवली येथील सभेतून जोरदार निशाणा साधला होता. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. उद्धव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेत असताना राज्यातील उद्योगधंदे बाहेर गेले कसे? असा सवाल राज ठाकरेंनी केला. तर यावरून ठाकरे गटानेही यावर उत्तर देत राज ठाकरेंवर पलटवार केलाय. ‘मोदी, शाहांनी महाराष्ट्रातून जे प्रकल्प पळून नेलेत. त्यावर नारायण राणेंनी एकदा तरी तोंड उघडले का?’ असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केला. तर जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि नाणार प्रकल्पावरून राज ठाकरेंनी ठाकरेंवर हल्ला चढवलाय. बघा स्पेशल रिपोर्ट काय केला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल?
Published on: May 06, 2024 10:59 AM
Latest Videos

'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद

'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट

करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'

'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
