कोंबडी विकता-विकता शिवसेनेत… नारायण राणेंवर पलटवार करत कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
'बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे अशी एक प्रक्रिया आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापना केली त्यावेळी तू होता का? तू तर नंतर आला कोंबडी विकता-विकता शिवसेनेत जॉईन झाला', नारायण राणे यांनी केलेल्या 'त्या' टीकेवर कुणाचा पलटवार?
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढत असताना तेव्हा कुठे होता शेंबड्या? अशा शब्दात भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नारायण राणे यांनी सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. नारायण राणे यांनी जिव्हारी लागणाऱ्या कलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘आदित्य ठाकरे यांनी जन्म झाल्या झाल्या काम करायला हवं होतं का? काही प्रश्न करतात’, असं म्हणत अंबादास दानवे यांनी नारायण राणेंवर पलटवार करत प्रतिसवाल केलाय. तर संघटना एक चालणारी प्रक्रिया आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे अशी एक प्रक्रिया आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापना केली त्यावेळी तू होता का? तू तर नंतर आला कोंबडी विकता-विकता शिवसेनेत जॉईन झाला, असं वक्तव्य करत अंबादास दानवे यांनी नारायण राणेंवर पलटवार करत खोचक टीका केली आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

