LSG vs KKR : निकोलस पूरनची विकेट पडताच गौतम गंभीर झाला चार्ज, मैदानात असा पाठवला मेसेज Watch Video

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत प्लेऑफमधील स्थानही पक्कं केलं आहे. गौतम गंभीर मेंटॉर झाल्यापासून संघात बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. लिलावापासून आतापर्यंत बरंच काही घडलं आहे. अशीच प्रचिती लखनौ विरुद्धच्या सामन्यात आली.

LSG vs KKR : निकोलस पूरनची विकेट पडताच गौतम गंभीर झाला चार्ज, मैदानात असा पाठवला मेसेज Watch Video
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 4:45 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला 98 धावांनी पराभूत केलं आणि अव्वल स्थान गाठलं. तसेच 16 गुण मिळवले असून प्लेऑफमधील स्थानही पक्कं केलं आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी पाहून क्रीडाप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. यात मेंटॉर गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. लिलावात मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी गौतम गंभीरने सर्वस्व पणाला लावलं होतं. 24.50 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं. त्यानंतर सुनील नरीनला ओपनिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याचे चांगले परिणाम आतापर्यंतच्या सामन्यात दिसून आले आहेत. आता गौतम गंभीर प्रत्येक सामन्यात कशी रणनिती आखतो याचा व्हिडीओ समोर आला आहे. लखनौ सुपर जायंट्सला 98 धावांनी पराभूत केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात गौतम गंभीर डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे.

निकोलस पूरन पाचव्या गड्यासाठी मैदानात उतरला होता. निकोलस पूरनची आक्रमक शैलीचा अंदाज प्रत्येकाला आहे. एकदा का बॅट चालली की मग मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे त्याची विकेट कोलकात्यात्यासाठी खूपच महत्त्वाची होती. 12 षटक आंद्रे रस्सेलला सोपवलं होतं. या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर पूरन यष्टीमागे झेल देत बाद झाला. फिल सॉल्टने यष्टीमागे कोणतीही चूक न करता झेल पकडला आणि त्याचा डाव 10 धावांवर आटोपला. त्याची विकेट पडताच डगआऊटमध्ये बसलेला गौतम गंभीरने जल्लोष केला. तसेच लगेच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या खेळाडूंना जवळ बोलवलं आणि श्रेयस अय्यरकडे एक मेसेज पाठवला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.