AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरात शौचालय आहे का? उमेदवारांना द्यावं लागणार प्रमाणपत्र; अन्यथा… नवा नियम काय?

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्‍या अनुषंगाने सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजीच्‍या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका मुख्‍यालयात झालेल्‍या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती देण्‍यात आली होती.

तुमच्या घरात शौचालय आहे का? उमेदवारांना द्यावं लागणार प्रमाणपत्र; अन्यथा... नवा नियम काय?
BMC Election 2026Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 27, 2025 | 5:16 PM
Share

राज्य निवडणूक आयोगने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने सादर करावयाच्या विविध शपथपत्रे व घोषणापत्रांबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. नामनिर्देशनपत्राच्या छाननीवेळी सदर प्रमाणपत्र अथवा स्वयंप्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी (RO) यांना असल्याचे माननीय राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

उमेदवारांसाठी एक विशेष अट

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शहरे, महानगरे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी एक विशेष अट घातली आहे. त्‍यासाठी सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ मध्‍ये सुधारणा करण्‍यात आली. त्‍यानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या अपात्रतेबाबतच्या कलमामध्ये शौचालयाचा नियमितपणे वापर करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करेल, अशा व्यक्ती निवडून येण्यास व सदस्य होण्यास निरर्ह ठरेल अशी तरतूद समाविष्ट करण्यात आली होती. म्‍हणजेच, निवडणूक लढवणारा उमेदवार हा शौचालय वापरणारा असावा अशी ही अट होती. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत ‘सहायक आयुक्त / प्रभाग अधिकारी यांचे प्रमाणपत्र’ सादर करण्याची तरतूद करण्यात आली होती. सन २०१७ च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता.

शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ साठी उमेदवारांना शौचालय वापराचे प्रमाणपत्र वा स्‍वयंप्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. स्वत:च्या मालकीचे घर असले आणि त्यात शौचालय असले तरी किंवा भाड्याच्या घरात राहत असलो आणि त्यात शौचालय असले तरी तसे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तसेच घरात शौचालय नसले तर सामुदायिक शौचालयाचा वापर करीत असल्याचे या प्रमाणपत्रात नमूद करावे लागणार आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्‍या अनुषंगाने सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजीच्‍या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका मुख्‍यालयात झालेल्‍या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती देण्‍यात आली होती. सहायक आयुक्‍त वा प्रभाग अधिकारी यांनी उमेदवारांना शौचालय वापर प्रमाणपत्र नियमाधीन कार्यवाही करावी. तसेच, शौचालयाची व्यक्तीची छायाचित्रे काढण्याची आवश्यकता नसून याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेण्याबाबत, महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने कळविण्‍यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.