बाळासाहेब आज असते तर यांना धु धु धुतलं असतं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केल आहे. काँग्रेसवरही एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर...

बाळासाहेब आज असते तर यांना धु धु धुतलं असतं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला
Eknath Shinde
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 5:09 PM

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 हल्ल्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कलम 370 कलम हटवताना यांनी बोंबाबोंब केली. काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असा म्हणणं वावगं ठरणार नाही. काँग्रेस जिंकतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात. मुंबई पोलीस आणि शहीदांचा कुटूंब हे शहीदांचा झालेला अपमान बघत आहे. नकली शिवसेना यावर गप्प का बसले आहेत. नकली हिंदुत्व वाले हे लोक… मी मर्द मर्द म्हणून होतं नाही.बाळासाहेब ठाकरे जर आज असते. तर यांना धु धु धुतलं असतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते.

वडेट्टीवार यांच्या निशाणा

मुख्यमंत्री या नात्याने मी विजय वडेट्टीवार यांच्या या वक्ताव्याचा निषेध करतो. विजय वडेट्टीवार हे राहुल गांधी यांच्या नादी लागून वेडे झालेत. त्याचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. शिवसेनेत होते. तेव्हा ते चांगला होते. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आशय चेक करून कारवाई केली जाईल. उज्वल निकम यांनी कसबाला फासावर लटकवलं एवढी हिमंत तुमच्यात आहे का?, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

काँग्रेसवर हल्लाबोल

अत्यंत दुर्दैवी भाष्य काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलं आहे. या वक्तव्यामुळे शहिदांचा अपमान काँग्रेसने केला आहे. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं, ही देशभक्ती होती. शहीदाचा अपमान करणाऱ्याचा बदला जनता घेईल. मुंबईत बॉम्बब्लास्ट झाल्यानंतर खरंतर बदला, आपण घ्यायला हवा होता. पण काँग्रेस सरकारने तो घेतला नाही. काँग्रेस पाकिस्तान धार्जिना आहे. ही भूमिका देशाला परवडणारी नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

आनंद दिघे यांचं ठाणे जिल्हाप्रमुख पद काढणार होते. मात्र त्यांचं पद काढल्याने सर्वजणच नाराज झाले असते. त्यामुळे त्यांचं पद काढलं गेलं नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.