लोक नाटकाचं तिकीट काढतात, पण…; देवेंद्र फडणवीसांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

Devendra Fadnavis on Amol Kolhe Shirur Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोक नाटकाचं तिकीट काढतात, पण...; देवेंद्र फडणवीसांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 4:26 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप गेलं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत. शिरूरची जनता हुशार आहे. कोल्हे लोकांमध्ये गेले की त्यांचं जोरदार स्वागत होतंय. मग कोल्हेंना वाटत वा वा काय स्वागत होत आहे… मात्र जनता हळूच विचारते की खासदार साहेब पाच वर्षे कुठे होतात?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिरूर आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुढील दोन ते अडीच वर्षात सोडवणार आहोत. भारतात गुंतवणूक आली की ती महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात आली की ती किती पहिली पुण्यात येते. आपल्यासोबत मजबूत पंतप्रधान आहेत, असंही फडणवीस म्हणालेत.

नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सेवा मोफत देण्याच काम नरेंद्र मोदींनी केलं. दिव्यांगांसाठी फायद्याच्या योजना आणल्या. पारंपरिक व्यवसाय करण्याचा आर्थिक फायदा कसा होईल, यासाठी योजना आणली आणि अनेक उद्योजक त्यातून तयार झाले. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक कर्ज मोदींनी दिलं. मोदी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा आपल्या राज्यातील जाणते राजे हे म्हटले की मोदी यांना उसातले काय समजतं? मात्र मोदींनी ऊसाच्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळवून दिले, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय.

पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

ऊसाच्या शेतकऱ्यावर इन्कटॅक्स लावला होता. पवार हे पंतप्रधान याना भेटायचे मात्र हात हालवत पुन्हा माघारी यायचे. शेतकऱ्यावर असलेला इन्कमटॅक्स वाढत गेला. मोदींनी शेतकऱ्याचा टॅक्स माफ करण्याचे काम केले . देशाच्या लोकसभेत आढळराव यांनी चांगलं काम केलं असून त्यांनी चांगला संघर्ष केला. शिवाजी आढळराव आणि महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यती सुरू केल्या. आपलं सरकार आलं. म्हणून हे शक्य झालं. ही जागा आता राष्ट्रवादीकडे गेली आणि आढळराव हे शिवसेनेचे होते. आता आढळराव यांनी पक्ष बदलला आहे. मी मधस्थी केली आणि महायुतीकडून आढळराव यांना उमेदवारी देवू उमेदवारी घोषित झाली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Non Stop LIVE Update
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.