एकता कपूर – सलमान खान यांच्यात चांगलीच जुंपली! टीव्ही क्वीन भाईजानला स्पष्टच म्हणाली, ‘एक्सचा उल्लेख वेड्यासारखा…’

अभिनेता सलमान खान आणि टीव्ही क्वीन एकता कपूर यांच्यात चांगलीच जुंपली असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे... सध्या एकता कपूर हिने केलेल्या पोस्टची चर्चा रंगील आहे...

एकता कपूर - सलमान खान यांच्यात चांगलीच जुंपली! टीव्ही क्वीन भाईजानला स्पष्टच म्हणाली, एक्सचा उल्लेख वेड्यासारखा...
एकता कपूर - सलमान खान
| Updated on: Aug 04, 2026 | 8:16 AM

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सांगायचं झालं तर, सलमान जेव्हा ‘अलायंस’ शोच्या प्रमोशन दरम्यान म्हणाला की, ‘मला असं वाटतं की, आता रितेश देशमुख याची नोकरी धोक्यात आहे…, तेव्हा सलमान याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. चाहत्यांमध्ये सध्या फक्त सलमानच्या वक्तव्याची चर्चा रंगली असून ‘लॉकअप’मध्ये सलमान, रितेश आणि फराह खान यांना रिप्लेस करणार का? असं देखील म्हटलं जात आहे. यावर रितेश आणि फरहा यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नसून ‘लॉकअप’ निर्माती एकता कपूर हिने इन्स्टाग्रामवर असं काही लिहिलं आहे की, अनेकांनी असं गृहीत धरलं आहे की, एकता हिने सलमान याच्यावरच निशाणा साधला आहे.

एकता कपूर हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी एखाद्या वेड्या एक्स प्रमाणे प्रत्येक एपिसोडमध्ये तुमचाच उल्लेख करतो…’, आता जेथे सलमान खान याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे, तर दुसरीकडे एकता हिची पोस्ट देखील चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त एकता आणि सलमान खान यांची चर्चा रंगलेली आहे.

प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, भाऊ सोहेल खान याला सपोर्ट करण्यासाठी सलमान खान ‘अलायंस’ शोमध्ये आलेला. सलमान खान याला पाहिल्यानंतर सर्व स्पर्धकांना असं वाटलं की, सलमान होस्ट करण्यासाठी आला आहे. पण सलमान याने सर्व स्पर्धकांसोबत गप्पा मारल्या. पण शोमध्ये भाईजानने केलेलं एक वक्तव्य सर्वत्र चर्चेत आलं आहे आहे.

विनोदी अंदाजात सलमान खान म्हणाला, ‘रितेश देशमुख याची नोकरी धोक्यात आहे…’, पण यावर रितेश काहीही म्हणाला नाही. शिवाय फराह खान हिने देखील कोणतीत प्रतिक्रिया दिली नाही. पण एकता कपूर हिच्या पोस्टला चाहत्यांनी सलमान खान सोबत जोडलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान आणि  एकता कपूर यांच्याच चांगली मैत्री आहे… एकदा अनेकदा ‘बिग बॉस’ शोमध्ये देखील आली आहे. शिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us