Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या अडचणींत वाढ, पगार थकबाकी प्रकरणी कर्मचाऱ्याकडून 2 कोटींचा दावा

गेल्या दोन वर्षांपासून आपण श्वेताला पैशासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, माझ्या मेसेजला उत्तर न देता श्वेताने मला ब्लॉक केले असल्याचे म्हणत राजेश पांडेने तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:15 PM, 25 Nov 2020

मुंबई : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीवर (Shweta Tiwari) तिच्या एका कर्मचार्‍याने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्रीच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या राजेश पांडेंनी (Rajesh Pande) श्वेताने आपले 52,000 रुपये बुडवल्याचा आरोप केला होता. आता या कर्मचाऱ्याने श्वेता विरोधात कारवाई करत तिच्या विरुद्ध 2 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे (Ex-Employee Rajesh Pande filed case against Actress Shweta Tiwari).

गेल्या दोन वर्षांपासून आपण श्वेताला पैशासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, माझ्या मेसेजला उत्तर न देता श्वेताने मला ब्लॉक केले असल्याचे म्हणत राजेश पांडेने तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्वेता माझ्यावर खोटे आरोप करतेय : राजेश पांडे

श्वेता विरोधात मानहानीची तक्रार दाखल करताना राजेष पांडे म्हणाले की, आता श्वेता त्यांच्यावर खोटे आरोप करत आहे. तिच्या या आरोपांमुळे माझी समाजातील प्रतिष्ठा खराब होत आहे. मागील 2 वर्षांपासून मी तिच्याकडे माझ्या मेहनतीच्या पैशांची मागणी करत असून, 50 हजार रक्कम ही तिच्याशी मोठी नाही. तरीही ती माझी अडवणूक करत आहे. म्हणूनच मी आता 2 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. कायदेशीर नोटीस श्वेताला पाठवली असून, अद्याप तिचे उत्तर आलेले नाही.(Ex-Employee Rajesh Pande filed case against Actress Shweta Tiwari)

पगारही दिलेला नाही!

आपली व्यथा मांडताना राजेश पांडे सांगतात, ‘मी गेली पाच वर्षे श्वेता तिवारीच्या अभिनय शाळेत शिक्षक म्हणून कामा करत होतो. 2012पासून मी तिच्या अकादमीशी संबंधित होतो. या अकादमीत जवळपास 10-15 मुले नियमितपणे अभिनय शिकण्यासाठी यायची. मात्र, दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी विद्यार्थी नसल्यामुळे श्वेताला तिची अभिनय शाळा बंद करावी लागली होती. परंतु, तिने मला पूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टीला आता दोन वर्षे झाली आहेत. ठरल्याप्रमाणे ना तिने मला पगार दिला आहे, ना आयकरच्या नावावर कापलेले पैसे परत केले.’ (Ex-Employee Rajesh Pande filed case against Actress Shweta Tiwari)

आज कोरोना काळात सगळेजण एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. मात्र, याकाळातही श्वेता तिवारी माझे पैसे परत देत नाहीय. एक महिन्याचा पूर्ण पगार 40,000 रुपये आणि प्राप्तीकराच्या नावाखाली कापलेले 10% प्रमाणे 12,000 रुपये इतकी रक्कम तिने अडकवून ठेवली आहे. सर्व शाळा गेल्या 6-7 महिन्यांपासून बंद असल्याने, मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे विस्कळीत झालो असल्याचे, राजेश पांडे म्हणाले.

श्वेता पैसे परत करेल अशी आशा!

या दरम्यान त्यांनी श्वेताला पैसे द्या म्हणून बरेच मेसेज आणि कॉल केले.  परंतु, तिने त्यांना उत्तर दिले नाही. तसेच श्वेताने त्यांचा नंबर ब्लॉक केला आहे. आता माझ्याकडे घर भाडे देण्या इतके पैसे देखील नसल्याचे राजेश पांडे म्हणाले.

(Ex-Employee Rajesh Pande filed case against Actress Shweta Tiwari)