छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप, दोन वर्षापासून कर्मचाऱ्याला पैसेच दिले नाहीत!

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीवर (Shweta Tiwari) तिच्या एका कर्मचार्‍याने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप, दोन वर्षापासून कर्मचाऱ्याला पैसेच दिले नाहीत!
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 6:46 PM

मुंबई : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीवर (Shweta Tiwari) तिच्या एका कर्मचार्‍याने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या राजेश पांडेंनी (Rajesh Pande) श्वेताने आपले 52,000 रुपये बुडवल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते श्वेताला पैशासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मेसेजला उत्तर न देता श्वेताने त्यांना ब्लॉक केले आहे. (Famous Television Actress Shweta Tiwari’s Ex employee Rajesh Pandey alleged  Money fraud)

पगारही दिलेला नाही!

आपली व्यथा मांडताना राजेश पांडे सांगतात, ‘मी गेली पाच वर्षे श्वेता तिवारीच्या अभिनय शाळेत शिक्षक म्हणून कामा करत होतो. 2012पासून मी तिच्या अकादमीशी संबंधित होतो. या अकादमीत जवळपास 10-15 मुले नियमितपणे अभिनय शिकण्यासाठी यायची. मात्र, दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी विद्यार्थी नसल्यामुळे श्वेताला तिची अभिनय शाळा बंद करावी लागली होती. परंतु, तिने मला पूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टीला आता दोन वर्षे झाली आहेत. ठरल्याप्रमाणे ना तिने मला पगार दिला आहे, ना आयकरच्या नावावर कापलेले पैसे परत केले.’

आज कोरोना काळात सगळेजण एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. मात्र, याकाळातही श्वेता तिवारी माझे पैसे परत देत नाहीय. एक महिन्याचा पूर्ण पगार 40,000 रुपये आणि प्राप्तीकराच्या नावाखाली कापलेले 10% प्रमाणे 12,000 रुपये इतकी रक्कम तिने अडकवून ठेवली आहे. सर्व शाळा गेल्या 6-7 महिन्यांपासून बंद असल्याने, मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे विस्कळीत झालो असल्याचे, राजेश पांडे म्हणाले. (Famous Television Actress Shweta Tiwari’s Ex employee Rajesh Pandey alleged  Money fraud)

श्वेता पैसे परत करेल अशी आशा!

या दरम्यान त्यांनी श्वेताला पैसे द्या म्हणून बरेच मेसेज आणि कॉल केले.  परंतु, तिने त्यांना उत्तर दिले नाही. तसेच श्वेताने त्यांचा नंबर ब्लॉक केला आहे. आता माझ्याकडे घर भाडे देण्या इतके पैसे देखील नसल्याचे राजेश पांडे म्हणाले.

आता ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचल्यावर तरी ती आपले पैसे परत करेल अशी आशा राजेश यांना आहे. ते म्हणतात, ‘ती स्त्री असल्याने मी तिचा खूप मान राखतो आहे. परंतु तिचे हे कृत्य माफीस पात्र नाही. अशा वेळी माझ्याडेच पैसे नसताना, मी कोणाकडे मदत मागू?’, असा सवाल त्यांनी केला आहे.

बरेच प्रेक्षक श्वेता तिवारीला आदर्श मानतात. लोक तिला खूप पसंत करत, पण मी तिची ही दुसरी बाजू बघितली आहे. स्वत: च्या परिस्थितीवर आता मलाच लाज वाटते आहे. केवळ 3-4 दिवस जेवू शकेन, इतकेच पैसे माझ्याजवळ शिल्लक आहे. मदतीच्या अपेक्षेने तरी त्या माझे पैसे परत देतील, अशी मला आशा आहे’, असे म्हणत त्यांनी मदतीसाठी आर्जव केले आहे.

Remo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

(Famous Television Actress Shweta Tiwari’s Ex employee Rajesh Pandey alleged  Money fraud)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.