Remo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

Remo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

गाझियाबाद येथे राहणाऱ्या सत्येंद्र त्यागी यांनी रेमो आणि त्याच्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Oct 27, 2020 | 2:00 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा (choreographer Remo Dsouza) आणि त्यांची पत्नी लीझल गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. मात्र, आत दोघांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र सादर केले आहे. गाझियाबाद येथे राहणाऱ्या सत्येंद्र त्यागी यांनी रेमो आणि त्याच्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.(Charge sheet filed against famous choreographer remo Dsouza and his wife at Ghaziabad)

सत्येंद्र त्यागी यांनी सांगितले की, 2013मध्ये रेमो डिसूझाने ‘अमर मस्ट डाय’ या नावाचा चित्रपट बनविला होता. या चित्रपटासाठी रेमोने त्यांच्याकडून 5 कोटी रुपये उधारीवर घेतले होते. शिवाय 1 वर्षात याच्या दुप्पट पैसे परत करण्याचे वचन रेमोने सत्येंद्र यांना दिले होते. मात्र, ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे रेमोने सत्येंद्र यांना पैसे परत केले नाहीत. म्हणूनच त्यांनी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

रेमो आणि सत्येंद्र यांची मैत्री

रेमो विरोधात तक्रार करणारे सतेंद्र त्यागी हे मोरेटा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वकील मोहनीश जयंत यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले, कोरिओग्राफर रेमो आणि सतेंद्र त्यागी या दोघांची चांगली मैत्री होती. रेमो बर्‍याच वेळा त्याच्या घहीरी आला होता. रेमोने सतेंद्र त्यागी यांना चित्रपटसृष्टीत पैसे गुंतवून अधिक पैसे कमविण्याचे आश्वासन दिले होते. रेमोच्या या सल्ल्यानुसार सतेंद्र त्यागी यांनी सात वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपये रेमोला दिले होते. (Charge sheet filed against famous choreographer remo Dsouza and his wife at Ghaziabad)

परंतु नंतर रेमोने फसवणूक करून त्यांना पैसे परत देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर सत्येंद्र यांनी रेमो विरोधात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार रेहानो डिसूझाविरोधात सिहानी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रेमो डिसूझा आणि त्यांच्या पत्नीला आरोपी ठरवून सदर आरोपपत्र दाखल केले आहे.

चार वर्षांपूर्वी तक्रार दाखल

सत्येंद्र त्यागी यांनी 2016मध्ये गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस स्थानकात रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझल यांच्याविरूद्ध फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतरही रेमो आणि त्यांची पत्नी लीझल हजर झाले नाहीत. त्यानंतर रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. परंतु, रेमोने हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला होता.

रेमो डिसूझाच्या ‘अमर मस्ट डाय’ या चित्रपटात अभिनेता राजीव खंडेलवाल आणि अभिनेत्री जरीन खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. ‘अमर मस्ट डाय’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.

(Charge sheet filed against famous choreographer remo Dsouza and his wife at Ghaziabad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें