AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रील स्टार आहे, सर्वसामान्य नागरिक नाही, माझी गाडी कशी अडवली? प्रसिद्ध रील स्टारची भाईगिरी, मोठा राडा, थेट..

मी रील स्टार आहे... माझी गाडी टोल नाक्यावर अडवण्याची हिमत कशी झाली म्हणत रील स्टारने टोल नाक्यावर मोठा राडा केला. हेच नाही तर मी सर्वसामान्य नागरिक नाही मी रिल स्टार आहे रील स्टार आहे. म्हणते मोठा राडा टोल नाक्यावर एकी रील स्टारने केला.

मी रील स्टार आहे, सर्वसामान्य नागरिक नाही, माझी गाडी कशी अडवली? प्रसिद्ध रील स्टारची भाईगिरी, मोठा राडा, थेट..
Reel star
| Updated on: May 29, 2026 | 1:34 PM
Share

रील स्टारची गाडी अडवण्याची हिमत कशी झाली… मी रील स्टार आहे… माझी गाडी कशी टोल नाक्यावर अडवली? मी सर्वसामान्य नागरिक नाही.. माझी गाडी अडवलीच कशी… असा सवाल करत टोल नाक्यावर एका रील स्टारने धुमाकूळ घातला. त्याने टोल नाक्यावर गाडी उभी करून गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. रिल स्टारचा उद्दामपणा बघायला मिळाला. पुणे- पंढरपूर महामार्गावर एका टोल नाक्यावर रील स्टारने रात्री मोठा गोंधळ घातला. मी सर्वसामान्य नागरिक नसून रील स्टार आहे. माझी गाडी थांबवलीच कशी असा जबाव विचारताना रील स्टार दिसला. हेच नाही तर यानंतर माझी गाडी थांबवायची नाही, असा दमही त्याने दिला. हा रील स्टार दुसरा तिसरा कोणीही नसून महेश मोटे आहे. महेश मोटेने रील स्टार असल्याची दादागिरी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर केली.

या संपूर्ण राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या रील स्टार करिता कायदा नाही का? असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. महेश मोटे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो स्वत:वारंवार मी रील स्टार आहे सर्वसामान्य नागरिक नाही.. असे वारंवार सांगत आहे. टोल कर्मचाऱ्यासोबत जोरदार हुज्जत घालताना रील स्टार दिसत आहे.

यादरम्यान महेश मोटे चांगलाच रागात दिसला. महेश मोटे याने म्हटले की, मी रील स्टार आहे.. माझी गाडी सोडली नाही तर उद्यापासून रील बनवणार नाही. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला म्हटले की, काय मिळाल्या का सूचना? यादरम्यान रील स्टार याला बोलण्याकरिता एक व्यक्ती पुढे आला. त्याला बोलताना रील स्टारने म्हटले की, तुमचं काय.. तुमचे वय काय? मी तुम्हाला बोललो आहे? तुमचा काय संबंध बोलायचा. तुम्ही बोलायचे नाही. पुढे त्याने म्हटले की, सध्या मी आहे जेजुरीच्या टोल नाक्यावरती.

यावेळी टोलनाक्यावर फोनवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला तुमचे नाव काय हे विचारताना तो दिसतोय. यावेळी कर्मचारी बोलताना तो म्हणाला की, मी तुम्हाला काय म्हणालो… मी सामान्य माणूस नाही… मी सामान्य माणूस नाही… काय… मित्रांनो एखादा रील स्टारला 8 वर्ष झाले या महाराष्ट्रात घासतोय.. किती लोकांचे प्रॉब्लेम सोडवली किती लोकांना मदत केली.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Mote (@maheshmote29)

पण मित्रांनो जर आज माझी गाडी सुटत नसेल तर… ठीक आहे काही अडचण नाही. यावेळी महेश मोटे इतर लोकांना सांगताना दिसत आहे की, अरे मित्रा सांग रे त्याला महेश मोटे याची ही गाडी आहे महेश मोटे याची… महेश मोटेला अडवत आहे यार.. महेश मोटेला हा व्यक्ती अडवत आहे दादा… वरून भांडणे करत आहे… माझी गाडी आहे ही.. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट