
बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आपल्या ग्लॅमरस अंदाज व फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असलेली दिसून येते.

आता हिरोपंती-2 मधून तारा अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. सध्या तारा आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ताराने मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपमधील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


ताराच्या चाहत्यांनी तिची तुलना हॉलीवूड गायिका टेलर स्विफ्टशी केली आहे . गायिका टेलर स्विफ्ट देखील तिच्या बोल्डलूक ओळखली जाते. अशा परिस्थितीत तारा सुतारियाचा बँग लूक पाहून युजर्सनी तिची टेलर स्विफ्टशी तुलना करून कमेंट करायला सुरुवात केली..