AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farah Khan Viral Video: फराहचा कपाळावर टिळा लावण्यास नकार, भुवया उंचावल्या; नेटकरी भडकले

Farah Khan Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फराह खानने कपाळावर टीका लावण्यास नकार दिल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

Farah Khan Viral Video: फराहचा कपाळावर टिळा लावण्यास नकार, भुवया उंचावल्या; नेटकरी भडकले
farah KhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 12:49 PM
Share

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचा प्रत्येक अंदाज चर्चेचा विषय ठरतो. कधी त्यांचे कोणतेही विधान चर्चेत असते, तर कधी त्यांचे वागणे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक फराह खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फराह खानने कपाळावर टीका लावण्यास नकार दिल्याचे दिसत आहे. ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमुळे फराह खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

फराह खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तिची वागणूक पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये फराह खान एका हॉटेलच्या लॉबीत दिसत आहेत. हॉटेलचे कर्मचारी आरतीची थाळी घेऊन तिचे स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी एक कर्मचारी फराहच्या जवळ आरती घेऊन येते आणि कपाळावर टिका लावण्यासाठी पुढे येते. मात्र व्हिडिओत फराहने टिका लावण्यास नकार देते. तिच्या याच अंदाजाबाबत सोशल मीडियावर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही युजर्सनी याला स्वागताच्या परंपरेशी जोडत नाराजी व्यक्त केली. तर काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की, फराह यांना कपाळावर टिळा लावायचा नव्हता तर अशा प्रकारच्या स्वागताबाबत त्यांनी आधीच माहिती होती का?

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी फराह खान यांच्यावर निशाणा साधला आहे. एका युजरने त्यांच्या वागणुकीबाबत कमेंट करत धार्मिक परंपरांचा आदर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. तर दुसऱ्या युजरने दावा केला की, फराह यांनी फुलांच्या पावसादरम्यानही अस्वस्थता दाखवली आणि माथ्यावर कुंकू लावण्यास नकार दिला. काही जणांनी त्यांच्या सार्वजनिक स्तरावर सेक्युलर असल्याच्या प्रतिमेचा उल्लेख करतही प्रश्न विचारले. एका युजरने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत लिहिले- ‘अशा लोकांना बोलावता कशाला?’ दुसऱ्याने लिहिले- ‘आणखी फेमस करा अशा लोकांना… आता काय सेलिब्रिटी झाले हे लोक… तुमच्या-आमच्या बोलण्याने काही होणार नाही.’

‘मैं हूं ना’पासून सुरू झाला दिग्दर्शनाचा प्रवास

फराह खान यांनी २००४ मध्ये शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी ‘ओम शांति ओम’, ‘तीस मार खान’ आणि ‘हॅपी न्यू इयर’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. कोरिओग्राफर म्हणूनही त्या बॉलिवूडमध्ये खास ओळखल्या जातात आणि सध्या यूट्यूबवरील आपल्या व्हिडिओंद्वारेही प्रेक्षकांशी जोडल्या जात आहेत.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...