रात्री बाथरूममध्ये घडली दुर्घटना, घरचे झोपेत; ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’च्या दिग्दर्शकाच्या निधनाबद्दल मोठी अपडेट

Sanjay Gupta: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते संजय गुप्ता यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वर्सोवा इथल्या राहत्या घरी ते बाथरुममध्ये घसरून पडल्याची माहिती समोर येत आहे.

रात्री बाथरूममध्ये घडली दुर्घटना, घरचे झोपेत; ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’च्या दिग्दर्शकाच्या निधनाबद्दल मोठी अपडेट
Sanjay Gupta
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2026 | 8:20 AM

Sanjay Gupta: बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील वर्सोवा इथल्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता शुक्रवारी रात्री आपल्या घरातील बाथरूममध्ये घसरून पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, ही घटना घडली तेव्हा त्यांच्या घरातील पत्नी, दोन मुलं आणि घरकाम करणारी महिला झोपलेली होती.

त्यामुळे रात्री घडलेल्या या अपघाताची कोणालाही तत्काळ माहिती मिळाली नाही. शनिवारी सकाळी संजय गुप्ता यांच्याबाबत काही हालचाल दिसत नसल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली. त्यावेळी ते गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading...

संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात संजय दत्त, आदित्य पांचोली आणि रवीना टंडन यांसारखे कलाकार होते. त्यानंतर त्यांनी ‘राम शास्त्र’, ‘जंग’ आणि ‘खौफ’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र, 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांवर मोठी छाप पाडली.

यानंतर ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘शूटआउट ॲट वडाळा’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुन्हेगारी, ॲक्शन आणि थरारपटांची प्रभावी मांडणी हे त्यांच्या दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य होतं. संजय गुप्ता यांच्या निधनानंतर अभिनेता संजय दत्तने भावूक पोस्ट शेअर केली. दोघांनी अनेक वर्षे एकत्र काम केलं होतं. ‘कांटे 2’ चित्रपटाबाबत नुकतीच चर्चा झाल्याचंही संजय दत्तने सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us