AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट; घटस्फोटानंतर पुन्हा त्याच पत्नीसोबत केलेलं लग्न

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ते मध्यरात्री किचनमध्ये पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट; घटस्फोटानंतर पुन्हा त्याच पत्नीसोबत केलेलं लग्न
संजय गुप्ता आणि त्यांची पत्नीImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2026 | 2:01 PM
Share

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांच्या चित्रपटांमधील अॅक्शन आणि स्टाइलची नेहमीच चर्चा होत असे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणीही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. पत्नी अनुराधा यांच्यासोबत घटस्फोट, सहा वर्षांचं विभक्त आयुष्य आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच पत्नीसोबत लग्न, असा त्यांचा प्रवास होता. पत्नी आणि दोन्ही मुलांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. संजय गुप्ता आणि अनुराधा यांची प्रेमकहाणी तरुण वयात सुरू झाली. अनुराधा यांचं वय अवघं 22 वर्षे असताना दोघांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षे एकत्र संसार केल्यानंतर मात्र त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

अनुराधा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं की, विभक्त होण्यामागे केवळ संजय यांचीच चूक नव्हती. दोघांचाही या नात्यात वाटा होता. त्यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता.

सहा वर्षांनी पुन्हा एकत्र आले

घटस्फोटानंतरही संजय आणि अनुराधा यांच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला नव्हता. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात होते. संजय यांनी अनेकदा पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर सहा वर्षांच्या विभक्त आयुष्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये संजय यांनी अनुराधा यांच्यासोबत पुन्हा लग्न केलं. या लग्नामुळे त्यांच्या प्रेमकहाणीला नवं वळण मिळालं. विशेष म्हणजे, संजय यांनी आपल्या लग्नासाठी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाची तारीख निवडली होती.

सासरच्या मंडळींनी दिली साथ

संजय गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, घटस्फोटानंतरही अनुराधा यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मुलासारखं प्रेम दिलं. त्यांच्या आईच्या निधनाच्या काळात अनुराधा यांनी त्यांना मोठा आधार दिला होता. त्यामुळे दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. संजय गुप्ता यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ते कुटुंबासाठी वेळ काढत असत. त्यांच्या निधनाने पत्नी अनुराधा आणि मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?