AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर त्या भांडणावर गोविंदाच्या पत्नीने मौन तोडलं, म्हणाली आमच्या अफेअरबद्दल सर्वात आधी…

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा या सध्या चांगल्याच चर्चेमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सुनीता यांनी आपलं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अखेर त्या भांडणावर गोविंदाच्या पत्नीने मौन तोडलं, म्हणाली आमच्या अफेअरबद्दल सर्वात आधी...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 6:18 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा या सध्या चांगल्याच चर्चेमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सुनीता यांनी आपलं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुनीता यांच्या या यूट्यूब चॅनलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सुनीता आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेमध्ये आल्या आहेत. या मुलाखतीमध्ये सुनीता यांनी गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामधील भांडणं आणि नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कृष्णाची आई पद्मा शर्मा म्हणजेच गोंविदाच्या बहिणीसोबत आपले सबंध कसे होते? याबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना सुनीत यांनी म्हटलं की, कृष्णाची आई पद्मा शर्मा या मला खूप आवडत होत्या, सगळ्यात आधी गोविंदा आणि माझ्या अफेअरबद्दल त्यांनाच माहिती झालं होतं. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आज गोविंदाला जे काही यश मिळालं आहे, त्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे, असंही यावेळी सुनीता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी सुनीता यांना कृष्णा आणि त्याची पत्नी काश्मिरा शाहा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की, मी किती दिवस त्यांच्यावर नाराज राहू शकते, जर सर्व जण आप आपल्या जागेवर आनंदी आहेत, तर मग वाद कशासाठी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थिती केला.

दरम्यान यापूर्वी देखील अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता या चांगल्याच चर्चेमध्ये राहिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार गोविंदा आणि सुनीता यांच्यामध्ये देखील काही वाद होते, नात्यामध्ये तणाव निर्माण झाला होता, अशा बातम्या माध्यमातून समोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता ही मुलाखत दिली आहे, यामध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यांनी गोविंदा आणि त्याचा भाच्चा कृषा अभिषेक यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु