गोविंदाने 10 अफेअर्स आणि…, घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत असताना कोणी केला धक्कादायक खुलासा?
Govinda Divorce: गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचं 38 वर्षांचं नातं मोडणार? गोविंदाचे 10 अफेअर्स आणि... कोणी केली एवढा मोठा खुलासा? सध्या सर्वत्र गोविंदा याच्या खासगी आयुष्याची चर्चा

Govinda Divorce: बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं लग्न आणि कधी कोणाचा घटस्फोट होईल काहीही सांगता येत नाही. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची त्यांच्या जोडीदाराला घटस्फोट देत वैवाहिक नातं संपवलं आहे. आता अभिनेता गोविंदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा हिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दल दिग्दर्शक पहलाज निलहानी यांनी अनेक गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या…
सांगायचं झालं तर, गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असल्यामुळे पहलाज निलहानी यांची जुनी मुलाखत पुन्ही चर्चेत आली आहे. गोविंदा आणि पहलाज यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण त्यानंतर त्यांच्या नात्यात कटूता आली…
गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यावर पहलाज म्हणाले होते, ‘दोघांचं नातं कधीच मोडणार नाही… सुनीता आणि गोविंदा यांच्या प्रेमात कधीच कोणी येऊ शकत नाही… गोविंदा याचे 10 अफेअर्स झाले तरी दोघे विभक्त होण्याचा विचार करणार नाहीत….’ असं देखील पहलाज म्हणाले होते.
पहलाज पुढे म्हणाले, ‘गोविंदा आणि सुनीता एकत्र राहत नाही. कारण गोविंदा त्याच्या मिटिंग दुसऱ्या बंगल्यावर ठेवतो. गोविंगा रात्री उशिरा झोपतो. नाहीतर सुनीता कायम त्याच्या सोबत असते. आता गोविंदा याच्याकडे कोणताच सिनेमा नाही. प तो शो करत असतो आणि सुनीता दुसरे व्यवसाय सांभाळते…’
मुलांसोबत राहते सुनीता…
सांगायचं झालं तर, एकदा खुद्द सुनीता हिने सांगितलं होतं की, ती आणि गोविंदा वेगळे राहतात. ‘आमचे दोन घर आहेत. अरार्टमेंट समोर एक बंगला आहे. फ्लॅटमध्ये माझं मंदिर आहे आणि माझी मुलं तिथे राहतात. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो… गोविंदा रात्री उशिरा मिटिंग संपवून घरी येतो…’ असं सुनीता म्हणाली होती.
ही पहिला वेळ नाही जेव्हा गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. गोविंदाचा मॅमेजर शशी सिन्हा यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आणि सुनीताच्या स्पष्टवक्त्यामुळेच हे प्रकरण अधिक भडकल्याचे संकेत दिले. ‘सुनीता यांनी नुकतााच झालेल्या मुलाखतींमध्ये जे काही सांगितलं आहे, ते त्या सर्व गोष्टींचे परिणाम आहे. त्या जरा जास्तच बोलल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे गोविंदा साहेब.. आमच्यात काही मतभेद आहेत.’ सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
