मध्यरात्री हुक्का बारमध्ये ‘गोपी बहू’सोबत काय झालेलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि…
Saath Nibhaana Saathiya Fame Gia Manek: हुक्का बारमध्ये गोपी बहूसोबत घडलेली 'ती' घटना, मध्यरात्री अभिनेत्रीवर आलेलं संकट, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर..., सध्या सर्वत्र सुरु आहे अभिनेत्रीची चर्चा...

Saath Nibhaana Saathiya Fame Gia Manek: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जिया मानेक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत गोपी बहू या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री जिया हिने वयाच्या 39 व्या वर्षी लग्न केलं आहे. सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने ‘दीया और बाती हम’ फेम अभिनेता वरुण जैन याच्यासोबत लग्न केलं.
सध्या वरुण आणि जिया यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात केल्यामुळे अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा जिया हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
View this post on Instagram
2012 मध्ये जिया हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली होती. 2012 मध्ये जिया हिच्यासोबत असं काही झालं ज्यामुळे अभिनेत्रीचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जिया हिला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे, ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा कोणालाच विश्वास बसत नव्हता…
मीडिया रिपोर्टनुसार, जिया मानेक हिला मुंईतील एका हुक्का बारमधूल ताब्यात घेण्यात आलं होतं. हुक्का बारवर पोलिसांनी अचानक छापेमारी केली आणि त्यामध्ये पोलिसांनी अभिनेत्रीला ताब्यत घेतलं. पण ते हॉटेल आणि हुक्का बार देखील असल्यामुळे जिया हिला देखील ताब्यात घेतलं.
View this post on Instagram
पण सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला सोडून देखील दिलं. रिपोर्टनुसार, तेव्हा त्या हॉटेल मध्ये जिया आई आणि तिच्या काही मैत्रिणींसोबत डिनरसाठी आली होती. रात्री 12 वाजता पोलिसांनी छापेमारी केली… पण जिया नशेत नसल्याने पोलिसांनी तिला सोडलं…
यावर जिया हिने देखील स्पष्टीकरण दिलं होतं, ‘आमचं डिनर पूर्ण झालं होतं. आम्ही बिलची वाट पाहात होतो. जेव्हा तिथे छापा टाकण्यात आला. तेव्हा जिया मानेक हिने सांगितलं की, पोलिसांना तिच्याबद्दल गैरसमज झाला होता. तिने जेवणाचं बिल पोलिसांना दाखवलं त्यानंतर तिला सोडण्यात आलं.
जिया मानेक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
