‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

अभिनेता मधुर मित्तलविरोधात (Madhur Mitta) लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'या' बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 9:57 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मधुर मित्तलविरोधात (Madhur Mitta) लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली असून मुंबईतील खार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारीला मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला मारहाण केल्याचं तिने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. (FIR lodged against actor Madhur Mittal in sexual assault and assault case)

मारहाण करुन जखमी करणे आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधुरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवसा अगोदर मधुर आणि या तरुणीचे ब्रेकअप झाले होते. 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी ब्रेकअप केले होते. परंतू, त्यानंतर 13 फेब्रुवारीला मधुरने तरुणीच्या घरात घुसून तिला मारहाण केली, असं तरुणीच्या वकिलांनी सांगितलं.

मधुर खूप जास्त रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट तिच्या घरात घुसला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानाखाली लावल्या. तसंच तिचे केस, कान ओढले. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.मधुरने ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटात काम केलं आहे. स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील भूमिका सर्वांना आवडली होता.

संबंधित बातम्या :

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

Thalaivi | लवकरच ‘थलायवी’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राच्या ‘या’ पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष, तुम्हालाही हसू आवरणार नाही

(FIR lodged against actor Madhur Mittal in sexual assault and assault case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.