Video : ना चेहऱ्यावर भीती, ना कायद्याचा धाक; टायगरवर बेछूट गोळीबार करणारे तिघेही कॅमेरात कैद, थरकाप उडवणारा व्हिडिओ
जॅकी श्रॉफचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करुन त्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या कारवरील गोळीबाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये आरोपी स्पष्टपणे दिसून येत आहेत.

मुंबईमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता टायगर श्रऑफ याच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या गोळीबारामध्ये टायगर बचावला आहे. पण इतर दोघे जखमी झाले आहेत. जुहूमधील पुष्पा पार्क याठिकाणी टायगर फुटबॉल सामना खेळण्यासाठी गेला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. यावेळी फुटबॉल खेळून निघताना टायगरवच्या कारवर मोठा गोळीबार करण्यात आला. या घटनेचा थरार व्हिडिओही आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, टायगर आणि त्याचा ड्रायव्हर हे कारमधून निघून जात होते. त्याचवेळी तिघाजणांनी कारवर बेछूट गोळीबार केला. पुष्पापार्कमधला हा थरारक गोळीबार समोर आल्यानंतर टायगर अत्यंत थोडक्यात बचावल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. टायगरच्या ड्रायव्हरला हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. तिथे एक रिक्षाचालकही होता, ज्याला गोळी लागून तोही जखमी झाला आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरु आहेत.
दरम्यान, तीन जणांनी जो गोळीबार केला त्यावेळी एकाची बंदूक जाम झाल्यामुळेही पुढील मोठा अनर्थ टळला आहे. एकूण पाच राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आहे. गोळीबारामध्ये टायगरच्या कारचालकाच्या हाताला गोळी चाटून गेली. त्याशिवाय एकजण जखमी असल्याच्या माहितीचीही पुष्टीही पोलिसांनी केली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा टायगरने स्वतः कारचा ताबा घेतला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचीही माहिती समोर आली आहे.
#TigerShroff: A video purportedly shows the three assailants firing towards the actor and his car.
Extremely disturbing visuals. Such a relief to know that he is safe. 🙏 https://t.co/v9Inh4frgu
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 18, 2026
दरम्यान, ज्यांनी टायगरच्या गाडीवर गोळीबार केला. ते कोणतेही मास्क किंवा मुखवटे लावून आले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा कायद्याचा धाक दिसत नव्हता. दरम्यान, आता या प्रकरणाच्या तपासासाठी १५ विशेष पोलिसांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे.
