
माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू यांची मुलगी राबिया तिच्या फॅशनेबल व्यक्तिमत्त्वामुळे आणि सुंदर लुकमुळे चर्चेत असते. असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही की रबियाचा हा ग्लॅमरस अंदाज बॉलिवूडच्या अभिनेत्रीं सारखा आहे. तिच्या जबरदस्त लुकमुळे राबिया सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

फॅशनमध्ये राबियाला खूप रस आहे. ती फॅशन अँड डिझाईनमध्ये मास्टर्सही करत आहे. राबिया तिच्या कुटुंबातील प्रत्येकाची लाडकी आहे.

राबियाचे फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहे. इन्स्टाग्रामवर राबिया आपल्या कुटूंबासोबत फोटो शेअर करत असते.

राबियालाही ट्रॅव्हल करण्याची खूप आवड आहे, हे तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून स्पष्टपणे दिसतं.

बॉलिवूड स्टार्सच्या मुलांप्रमाणेच राबियाही लोकप्रिय स्टारकिड आहे, ती आता सोशल मीडियावर खळबळ उडवतेय. इन्स्टाग्रामवर राबियाचे 55.2 हजार फॉलोअर्स आहेत.