Gadar 2 च्या क्लायमॅक्स सीनची जोरदार चर्चा; अहमदनगरमध्ये पार पडलं शूटिंग

| Updated on: Feb 27, 2023 | 11:10 AM

या चित्रपटाची कथा फाळणीच्या 24 वर्षांनंतरची आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करसोबतची लढाईसुद्धा दाखवण्यात येणार आहे. गदर 2 मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे.

Gadar 2 च्या क्लायमॅक्स सीनची जोरदार चर्चा; अहमदनगरमध्ये पार पडलं शूटिंग
Gadar 2
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये सनी देओल पुन्हा एकदा अँग्री यंग मॅन तारा सिंगच्या अंदाजात आणि अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाकिस्तानी जनरल कादिरची भूमिका साकारलेला अभिनेता मनीष वाधवा ‘गदर 2’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा फाळणीच्या 24 वर्षांनंतरची आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करसोबतची लढाईसुद्धा दाखवण्यात येणार आहे. गदर 2 मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या मनीष वाधवाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गदर 2 ची संपूर्ण कथा ऐकवली. गदर : एक प्रेम कथा या चित्रपटात अमरिश पुरी यांनी अशरफ अलीची भूमिका साकारली होती. मात्र आज ते या जगात नाहीत. त्यामुळे चित्रपटात आता त्यांची जागा दुसरा कोणता अभिनेता घेणार नाही. गदर 2 मध्ये त्यांची भूमिकाच नाही.

हे सुद्धा वाचा

गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवसांची शूटिंग

अमरिश पुरी यांनी ज्या ताकदीने अशरफ अलीची भूमिका साकारली, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. यामुळेच सीक्वेलमध्ये त्यांच्या भूमिकेला रिप्लेस करण्यात आलं नाही, असंही मनीष यांनी स्पष्ट केलं. या चित्रपटात मनीष वाधवा हे पाकिस्तानी सैन्याच्या जनरलची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली.

विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी ॲक्शन सीन्स केले दिग्दर्शित

गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे.

पाकिस्तानी सैन्याशी लढणार तारा सिंगचा मुलगा

गदर 2 मध्ये तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे. उत्कर्षसोबतही अॅक्शन सीन्स शूट करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्यासोबतही त्याचे काही ॲक्शन सीन्स आहेत.

मुलाच्या प्रेमाखातर जाणार सीमापार

गदर 2 ची कथासुद्धा मूळ रुपाने प्रेमाचीच आहे, मात्र यावेळी उत्कर्ष म्हणजेच चरणजीतचं प्रेम पाकिस्तानात आहे. मुलाच्या प्रेमाखातर तारा सिंगसुद्धा सीमापार पोहोचणार आहे.