AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक अन् नेत्रदीपक सेट..; बिग बजेट ‘घबाडकुंड’ची जोरदार चर्चा

'घबाडकुंड'च्या रूपात शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत एक दर्जेदार बिगबजेट चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच चित्रपट पाहताना प्रेक्षकांना 'लार्जर दॅन लाईफ' असा अनुभव घेता यावा यासाठी 'घबाडकुंड'ची कलाकार-तंत्रज्ञांची टीम कठोर परिश्रम घेत आहे.

भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक अन् नेत्रदीपक सेट..; बिग बजेट 'घबाडकुंड'ची जोरदार चर्चा
ghabadkund movie setImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2025 | 4:48 PM
Share

जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली, कष्ट उपसले, खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं घबाड मिळावं आणि चुटकीसरशी श्रीमंत होता यावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक धनप्राप्ती होणे, एखादी लॅाटरी लागणे, नशीबच पालटणे असा घबाडचा अर्थ आहे. ‘कुंड’ म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हींचे मिळून ‘घबाडकुंड’ असे सिनेमाचे लक्षवेधी शीर्षक ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक, नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे. मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अ‍ॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. ‘घबाडकुंड’ या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत.

दिग्दर्शक प्रीतम पाटील ‘घबाडकुंड’च्या रूपात आणखी एक उत्कंठावर्धक कथानक असलेला बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर इथं सिनेमाचा सेट उभारला आहे. 10 ते 12 हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारख्या कलाकारांची फौज आहे.

मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला असून, विविध माध्यमांद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कलाकार या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे.

‘घबाडकुंड’ चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचं आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचं आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषा अभिषेक याची आहे. प्रोडक्शन मॅनेजर सिद्धार्थ आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?