AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्कर 2027 साठी ‘गोंधळ’ची निवड; पण अनुराग कश्यपांचा आक्षेप; निर्माते संतोष दावखर प्रतिक्रिया देत म्हणाले…

Anurag Kashyap On Anurag Kashyap: भारताने आगामी ऑस्कर २०२७ साठी गोंधळ या मराठी चित्रपटाला निवडले आहे. यावर अनुराग कश्यप यांनी आक्षेप नोंदवला आहे.

ऑस्कर 2027 साठी ‘गोंधळ’ची निवड; पण अनुराग कश्यपांचा आक्षेप; निर्माते संतोष दावखर प्रतिक्रिया देत म्हणाले...
| Updated on: Sep 23, 2026 | 10:10 PM
Share

२०२७ च्या ऑस्करसाठी नामांकन मिळालेला ‘गोंधळ’ हा एकमेव सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. संतोष दावखर यांचा ‘गोंधळ’ गेल्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, पण बॉक्स ऑफिसवर तो अयशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला हा चित्रपट आता २०२७ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ९९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ या श्रेणीत प्रवेश मिळाला आहे.

‘गोंधळ’च्या ऑस्कर नामांकनाच्या पार्श्वभूमीवर, अनुराग कश्यप यांच्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली. अनुराग कश्यप यांनी ‘गोंधळ’च्या ऑस्करमधील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ऑस्करसारख्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये भारत नेहमीच कमी पडतो. कारण आपण चुकीचे चित्रपट निवडतो. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’सारखे योग्य चित्रपट निवडण्याची संधी असतानाही आपण ती गमावली.

त्यांनी असा दावा केला की, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने गोंधळची निवड केली. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हे दोन्ही चित्रपट जाणूनबुजून निवडले गेले नाहीत. मात्र कश्यप म्हणाले की, त्यांनी अजून ‘गोंधळ’ पाहिला नसल्यामुळे त्याच्या ऑस्करच्या शक्यतांचे मूल्यांकन करणे खूप घाईचे ठरेल. त्यांनी असा इशाराही दिला की, ‘गोंधळ’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल.

ते म्हणाले की, या वर्षी स्पर्धा खरोखरच खूप कठीण आहे. ऑस्करसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांना मागे टाकणे यावर्षी अवघड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवणे हा भारतीय चित्रपटाच्या ऑस्कर रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असायला हवा. पात्रतेसाठी सर्वात महत्त्वाची अट ही असायला हवी की, चित्रपट भारताबाहेरील एखाद्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रदर्शित झालेला असावा किंवा त्याचे अमेरिकेत वितरण झालेले असावे किंवा वर्षअखेरपर्यंत अमेरिकन वितरक असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यानंतर, ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष दावखर यांनी आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, मला अनुराग कश्यप सरांबद्दल आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीबद्दल प्रचंड आदर आहे. २६ एप्रिल रोजी रात्री ११:५५ वाजता बंगळूर-मुंबई विमानात मी त्यांना ‘गोंधळ’बद्दल सांगितले. ते म्हणाले की, त्यांनी त्याबद्दल ऐकले नव्हते किंवा पाहिले नव्हते, पण ते तो चित्रपट नक्कीच पाहतील. तेव्हापासून तो चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध झालेला नाही, तसेच मुंबईतही प्रदर्शित झालेला नाही.

‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष दावखर पुढे म्हणाले, मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की, कोणतेही मत बनवण्यापूर्वी चित्रपट पाहा. चित्रपटसृष्टीबाहेरील एका नवीन चित्रपट निर्मात्याने बनवलेला ‘गोंधळ’ हा एक मानसशास्त्रीय थरारपट आहे, ज्यामध्ये मराठी संस्कृती तसेच जागतिक आकर्षण आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी बनवला आहे, ओटीटीसाठी नाही. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आम्हाला समजते आणि आम्ही आमच्या देशाला निराश करणार नाही.” दिग्दर्शकाने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आणि तो पुन्हा प्रदर्शित झाल्यावर त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी