AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : लाज वाटली पाहिजे.. गोविंदा कोमल राणीसोबत दिसताच नेटकऱ्यांचा संताप; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

अभिनेता गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्नी सुनीता अहुजा घरी असताना गोविंदा कोमलसोबत दिसल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

Govinda : लाज वाटली पाहिजे.. गोविंदा कोमल राणीसोबत दिसताच नेटकऱ्यांचा संताप; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
| Updated on: Sep 23, 2026 | 7:59 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच गणेशोत्सवादरम्यान, काल गोविंदा हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला, मात्र तेव्हा त्याच्यासोबत त्याची सहकलाकार आणि कथित गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकार सोबत होती. त्या दोघांचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो बराच व्हायरल झाला. पण या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून अनेकांनी कमेंट्स करत गोविंदाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

गोविंदा- कोमलचा व्हिडीओ समोर

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता गोविंदा आणि कोमल रानी स्वर्णकार हे दोघे भरगर्दीत बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले दिसले. याचदरम्यान गोविंदाने कोमल रानी हिचा हात पकडून तो तिला गर्दीतून बाहेर घेऊन जातानाही दिसला. दोघांमधील जवळीकीने अनेकांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे गोविंदा हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला येण्याच्या थोडा वेळ आधी सुनीता अहुजा तिथे दर्शनासाठी एकटी आली होती.

गोविंदा आणि कोमल राणी यांची एकत्र उपस्थिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनाबाबत सातत्याने चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. सुनीता अहुजाने यापूर्वी गोविंदा आणि कोमल राणी यांच्या जवळिकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अलीकडेच तिने एक विधान केलं होतं, ‘माणसं फसवणूक करणारी असतात, प्राणी त्यांच्यापेक्षा चांगले’, तिच्या या विधानाचाही याच वादाशी संबंध जोडला जात आहे. मात्र, सुनीता हिने हे विधान करताना गोविंदा किंवा कोमल राणी यापैकी कोणाचंही थेट नाव घेतलं नाही.

गोविंदा झाला ट्रोल

दरम्यान कालचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्सनी गोविंदाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. “ पत्नीला सोडून गर्लफ्रेंडसोबत दर्शनासाठी पोहोचला.” असं एकाने लिहीलं. तर दुसऱ्याने एक कमेंट केली की, “सुनीताजींनाही सोबत घेऊन जायला हवे होते.” एवढंच नव्हे तर काही लोकांनी गोविंदाला थेट सवाल विचारला. तो आपल्या मुलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू शकतो, मग पत्नीबरोबर का दिसत नाही? असं अनेकांनी म्हटलं. पत्नी आणि मुलं असताना गोविंदाने कोमल राणीसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणं योग्य नव्हतं, असं मत अनेकांनी मांडलं.  तर काहींनी “ लाज वाटायला पाहिजे” अशा प्रतिक्रिया देत त्याच्यावर कडाडून टीका केली. सामान्य लोकांना बिघडवण्यात बॉलिवूडचा मोठा वाटा असल्याचंही अनेकांनी म्हटलं. एका यूजरने तर सुनीता चुकीची नाही, असं म्हणत तिची बाजू घेतली.

दरम्यान अभिनेता गोविंदा आणि कोमल राणी यांनी त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी