AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिटनेस नसून देखील ही अभिनेत्री बनली सर्वात मोठी स्टार, कॉमेडीतून कमावलं नाव, 100 चित्रपटांमध्ये केलं काम

100 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्री कॉमेडीमध्ये कमवलं नाव. वयाच्या 10 व्या वर्षी बालकलाकार म्हणून केलेली अभिनयाला सुरुवात.

फिटनेस नसून देखील ही अभिनेत्री बनली सर्वात मोठी स्टार, कॉमेडीतून कमावलं नाव, 100 चित्रपटांमध्ये केलं काम
| Updated on: Apr 04, 2026 | 5:42 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये चित्रपट यशस्वी होण्यासाठी फक्त नायक-नायिकाच नाही तर सहाय्यक कलाकारांचाही मोठा वाटा असतो. खलनायक आणि कॉमेडियनशिवाय चित्रपटाची रंगत अपुरीच राहते. अशाच प्रभावी कॉमेडियनपैकी एक नाव म्हणजे गुड्डी मारुती. आपल्या वेगळ्या शैलीत आणि हटके अंदाजात त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केली.

4 एप्रिल 1961 रोजी मुंबईत जन्मलेल्या गुड्डी मारुती यांचं खरं नाव ताहिरा परब आहे. त्यांचे वडील मारुती राव परब हे स्वतः अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती. केवळ 10 वर्षांच्या वयात त्यांनी ‘जान हाजीर है’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. मात्र, वडिलांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. या कठीण काळात त्यांनी हार न मानता अभिनयाला आपला आधार बनवला.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

त्या काळात बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींसाठी ठराविक सडपातळ शरीरयष्टीला प्राधान्य दिलं जात होतं. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी सुरुवातीला अडथळा ठरली. पण गुड्डी मारूती यांनी यालाच आपली ताकद बनवलं. त्यांनी आपल्या कॉमिक टायमिंग आणि हजरजबाबी शैलीच्या जोरावर साइड रोल्समध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांना प्रेमाने ‘टुनटुन’ असंही म्हटलं जाऊ लागलं.

प्रसिद्ध दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना ‘गुड्डी मारुती’ हे नाव दिलं, ज्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी Dulhe Raja, Biwi No.1, Shola Aur Shabnam आणि Chor Machaaye Shor यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करतानाही त्यांनी आपली वेगळी ओळख कायम ठेवली.

काळासाठी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक

1995 साली Sorry Meri Lorry नंतर त्यांनी काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. जवळपास 9 वर्षांनंतर 2015 मध्ये Hum Sab Ullu Hain या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलं. यानंतर त्यांनी टीव्ही क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं. अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. टीव्हीवर त्यांनी गंभीर भूमिकाही साकारल्या, पण प्रेक्षकांना त्यांचा विनोदी अंदाजच अधिक आवडला.

टीव्हीमध्ये काम करताना त्यांनी आपलं वजनही मोठ्या प्रमाणात कमी केलं. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर गुड्डी मारूती यांचा विवाह अशोक नावाच्या व्यावसायिकाशी झाला असून ते मुंबईतील बांद्रा येथे राहतात.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने