Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रत्येक अभिनेत्याने प्रथम…’, रस्त्यावर निपचित पडलेल्या पुरुषासोबत अभिनेत्याने ‘हे’ काय केलं? व्हिडीओ तुफान व्हायरल

Bollywood | प्रसिद्ध अभिनेत्याने रस्त्यावर निपचित पडलेल्या पुरुषासोबत असं काय केलं ज्यामुळे..., थक्क करणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...; सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल. व्हिडीओ कमेंट करत नेटकरी म्हणाले...

'प्रत्येक अभिनेत्याने प्रथम...', रस्त्यावर निपचित पडलेल्या पुरुषासोबत अभिनेत्याने 'हे' काय केलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 8:54 AM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो.. सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल झाले तर, ते व्हिडीओ त्यांच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्यासंबंधी किंवा त्यांच्या फॅशन संबंधी असतील… असा अंदाज वर्तवण्यात येतो. पण सध्या प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल, पण अभिनेत्याचं कौतुक नक्कीच कराल… ऐरवी चाहते सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत असतात. पण आता अभिनेत्याने रस्त्यावर निपचीत पडलेल्या पुरुषाचे प्राण वाचवले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत..

व्हिडीओमध्ये पुरुषाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता गुरमीत चौधरी आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्यावर पडलेल्या पुरुषाचे सीपीआरच्या माध्यमातून प्राण वाचवताना दिसत आहे. तर जमलेल्या इतरांना देखील मदत करण्याचं आवाहन अभिनेता करताना दिसत आहे. अभिनेत्याच्या प्रयत्नांमुळे पुरुषाचे प्राण वाचल्यामुळे अनेक जण गुरमीत याचं कौतुक करत आहेत.

गुरमीत चौधरीने अंधेरीच्या रस्त्यावर पडलेल्या एका पुरुषाला सीपीआर दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून सीपीआरचं किती महत्त्व आहे हे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्यचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेता गुरमीत चौधरी याचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘उत्तम गुरमीत भाई…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेत्याने प्रथम माणूस असलं पाहिजे…’ व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

कोण आहे अभिनेता गुरमीत चौधरी?

अभिनेता गुरमीत चौधरी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. रामायणमधील श्रीराम ही भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. गुरमीत याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर अभिनेत्याने झलक दिखला जा 5, नच बलिए 6 आणि खतरो के खिलाडी 5 यांसारख्या शोमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

माय-लेकीच्या नात्यावर 'पुरातन', रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या...
माय-लेकीच्या नात्यावर 'पुरातन', रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या....
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?.
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.