AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput याच्या मृत्यूचं कारण अखेर समोर! अनेक वर्षांनंतर गर्लफ्रेंड स्पष्टच बोलली

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूत याने का संपवलं स्वतःचं आयुष्य? अखेर अनेक वर्षांनंतर गर्लफ्रेंडने सोडलं मौन, खासगी आयुष्याबद्दल देखील केलं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची वक्तव्याची चर्चा... तेव्हा नक्की झालं तरी काय होतं?

Sushant Singh Rajput याच्या मृत्यूचं कारण अखेर समोर! अनेक वर्षांनंतर गर्लफ्रेंड स्पष्टच बोलली
| Updated on: Oct 06, 2023 | 7:56 AM
Share

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याने स्वतःला संपवलं, सुशांत याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सुशांत मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला डेट करत होता. म्हणून अभिनेत्याच्या निधनानंतर रिया हिला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. पण आता अभिनेत्रीने पुन्हा स्वतःच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे. अशात सुशांत याने स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला… याचं कारण देखील रिया हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिलं आहे. सध्या सर्वत्र रिया हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे…

मुलाखतीत अभिनेत्री पूर्वीचं आयुष्य आणि आता जगत असलेल्या आयुष्यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. मोठ्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीने थेरेपीची मदत घेत मूव्ह ऑन केलं आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अनेकांनी रिया हिच्यावर निशाणा साधला होता. एवढंच नाही तर, सुशांत याच्या मृत्यूसाठी अभिनेत्रीला जबाबदार ठरवलं होतं…

नुकताच झालेल्या मुलाखतीत रिया म्हणाली, ‘वयाच्या ३१ व्या वर्षी मी ८१ वर्षांच्या महिलेप्रमाणे जगत होती. आयुष्य एक चक्र आहे आणि मी आता माध्यमांसोबत बोलू शकते. मी आता आयुष्यात पुढे जात आहे. कठीण प्रसंगाच्या वेळी तुम्ही देवदास बनता किंवा थेरेपीची मदत घेता. मी थेरेपीची मदत घेतली…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘दिवस वाईट आणि कठीण होते. पण एक दिवस सर्व काही ठिक होईल… यावर विश्वास होता.’ पुढे अभिनेत्रीला सुशांत याने जो निर्णय घेतला, त्यात तुझा वाटा होता का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर रिया म्हणाली, ‘मी लोकांचे चेहरे वाचू शकते. मला चुडैल हे नाव आवडलं, ज्याचा मला काहीही फरक पडत नाही. मला नाही माहिती सुशांत याने असं का केलं. पण तो कठीण परिस्थितीत होता एवढं माहिती आहे..’ असं अभिनेत्री म्हणाली.

सुशांत सिंह राजपूत याने घेतला मोठा निर्णय…

सुशांत सिंह राजपूत याने २०२० मध्ये राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तेव्हा रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सुशांत याने घेतलेल्या निर्णयानंतर रिया हिच्यावर संशय निर्माण झाला. यामुळे रियाला तुरुंगात जावे लागलं होतं.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.