AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचे प्रेमसंबंध, बायकोची सोडलेली साथ, पण…, पडद्यमागे नेमकं काय घडलेलं!

Rohit Shetty Love Life : तब्बल 14 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचे प्रेमसंबंध... तिच्यासाठी बायकोला देखील सोडललं, पण नाही टिकलं नातं... पडद्यामागे नेमकं काय घडलेलं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचे प्रेमसंबंध, बायकोची सोडलेली साथ, पण..., पडद्यमागे नेमकं काय घडलेलं!
Rohit Shetty
| Updated on: Sep 12, 2026 | 9:23 AM
Share

Rohit Shetty Love Life : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता रोहित शेट्टीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज रोहित त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रोहित शेट्टी यांचा संसार मोडेल… अशा स्थितीत होता. कारण रोहित याच्या अफेअरच्या चर्चा अभिनेत्री प्राची देसाई हिच्यासोबत रंगलेल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर, प्राची देसाई हिचा आज वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. प्राची 38 वर्षांची झाली आहे. टीव्ही विश्वातून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या प्राचीने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच दरम्यान, प्राची आणि रोहित यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला…

17 व्या वर्षी प्राचीचं टीव्ही विश्वात पदार्पण…

प्राची देसाई हिचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातच्या सुरत शहरात झाला. प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता आणि त्यामुळेच वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अभिनेत्रीने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. प्राची सर्वप्रथम एकता कपूर यांच्या ‘कसम से’ या मालिकेत झळकली, जी 2006 मध्ये सुरू झाली होती. या मालिकेत प्राचीने अभिनेता राम कपूर यांच्यासोबत काम केलं, दोघांमध्ये 15 वर्षांचं अंतर आहे.

टीव्ही विश्वात स्वतःचं स्थान पक्क केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडच्या दिशेने मोर्चा वळवला. 2008 मध्ये प्राची ‘रॉक ऑन’ सिनेमात झळकली, त्यानंतर ‘लाइफ पार्टनर’, ‘आई, मी और मैं’, ‘पुलिसगिरी’, ‘अजहर’, ‘रॉक ऑन 2’, ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई’, ‘बोल बच्चन’, ‘तेरी मेरी कहानी’ या सिनेमांमध्ये देखील प्राचीने महत्त्वाची भूमिका साकारली.

14 वर्ष मोठ्या रोहित शेट्टीसोबत अफेअर

रिपोर्टनुसार, प्राची आणि रोहित यांच्यामध्ये ‘बोल बच्चन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान प्रेम बहरलं. तेव्हा रोहित शेट्टी विवाहित होता. पण प्राचीवर असलेल्या प्रेमासाठी दिग्दर्शकाने बायकोला देखील सोडलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर प्रेमाचा त्याग करत रोहित याने कुटुंबियांची निवड केली.

आता काय करतेय प्राची देसाई?

प्राची देसाई आता अभिनयापासून दूर असून तिच्याकडे सध्यातरी कोणता प्रोजेक्ट नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन