Hemangi Kavi : ‘पंचविशीत ऐकलेली खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव!’, हेमांगी कवीची थँक यू पोस्ट

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा वाढदिवस नुकताच पार पडला. चाहत्यांनी हेमांगीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आता चाहत्यांचे आभार मानण्यासाठी हेमांगीनं खास पोस्ट लिहिली आहे.

Hemangi Kavi : पंचविशीत ऐकलेली खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव!, हेमांगी कवीची थँक यू पोस्ट
Hemangi Kavi
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 4:42 PM

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते. सध्या तिच्या नवनवीन सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत असते. आता नुकतंच 26 ऑगष्टला हेमांगीचा वाढदिवस पार पडला. चाहत्यांनी हेमांगीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आता चाहत्यांचे आभार मानण्यासाठी हेमांगीनं खास पोस्ट लिहिली आहे.

पाहा हेमांगीची खास पोस्ट

हेमांगी कवीनं लिहिलं, ‘तुमच्या शुभेच्छांसोबत, ‘चल, काही काय? 40?’ ‘कुठल्या angel ने 40?’ ‘आईय्या अजूनही किती लहान दिसत्येस’ ’21 वर्षांची असशील’ ‘एज इज जस्ट अ नंबर’ अरे यार, 40? हिचं काय करायचं? ’14 चं 41 चुकून लिहिलं असशील.. बरोबर कर’ वगैरे वगैरे… हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल, कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव! ही ही ही… जोक अपार्ट पण काल तुमच्या सोशल मीडियावर आलेल्या गोड गोड कमेंट्स, टेक्स्ट, डीएम्स, फोन कॉल्समुळे, माझ्यावर लिहिलेल्या राईट अप्समुळे माझा वाढदिवस झकास झाला त्यासाठी प्रत्येकाला थँक यू थँक यू सो मच! ऐसे ही प्यार और आशीर्वाद बना रहे दोस्तों! ❤️’

“बाई, बुब्स आणि ब्रा” हे चार चौघात चर्चेसाठी निषिद्ध

काही दिवसांपूर्वीच हेमांगीच्या एका फेसबुक पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टमध्ये हेमांगीनं “बाई, बुब्स आणि ब्रा” या चार चौघात चर्चेसाठी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं होतं.“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” असा मनमोकळा सवालही हेमांगीने विचारला होता.

संबंधित बातम्या

Chehre Review : अमिताभ बच्चन-इम्रान हाश्मी यांच्या दमदार अभिनयानंतरही नाही चालली जादू, वाचा कसा आहे ‘चेहरे’ चित्रपट

Sonu Sood Delhi: ‘देश के मेंटर’चा सोनू सूद ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; दिल्ली सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा

Birthday Special : अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी ‘या’ मोठ्या सेलेब्सना केलं डेट, वाचा बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाबद्दल खास गोष्टी

(Hemagi kavis post for thanking fans on social media for birthday wishes)