Birthday Special : अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी ‘या’ मोठ्या सेलेब्सना केलं डेट, वाचा बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाबद्दल खास गोष्टी

नेहा धुपियानं 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. ही जोडी पहिल्यांदा 2017 मध्ये झहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात एकत्र दिसली होती. (Before marring Angad Bedi, Neha Dhupia Dated big celebs, read special things about Bollywood actress Neha Dhupia)

Birthday Special : अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी 'या' मोठ्या सेलेब्सना केलं डेट, वाचा बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाबद्दल खास गोष्टी

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नेहा धुपिया (Bollywood Actress Neha Dhupia) आज तिचा वाढदिवस (Birthday Special) साजरा करत आहे. नेहा लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. नेहाचा जन्म 1980 मध्ये कोची, केरळ येथे झाला. ती एका पंजाबी शीख कुटुंबातून आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मोठ्या भूमिका पार पाडल्या आहेत. ज्याबद्दल ती नेहमीच चर्चेतही राहिली आहे. तिनं फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया युनिव्हर्सचा खिताबही आपल्या नावी केला आहे.

नेहा धुपियानं 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. ही जोडी पहिल्यांदा 2017 मध्ये झहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात एकत्र दिसली होती. मात्र आज हे जोडपं खूप छान एकत्र वेळ घालवत आहे. अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी नेहानं 3 मोठ्या सेलेब्सना डेट केलं आहे. तिचं नाव युवराज सिंग, स्क्वॅश खेळाडू ऋत्विक भट्टाचार्य आणि जेम्स सिल्वेस्टर यांच्याशीही जोडलेलं होतं. ऋत्विकसोबत नेहाचं नातं 10 वर्षे टिकलं. मात्र 10 वर्षांनंतर ही जोडी तुटली. त्यानंतर नेहा 3 वर्षे जेम्स सिल्वेस्टरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र हे दोघं वेगळे का झाले हे कोणालाच माहीत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा धुपियाच्या लग्नामुळे सगळेच आश्चर्यचकित

नेहा आणि अंगदनं त्यांच्या लग्नाचे फोटो थेट सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या जोडप्याचं लग्न दिल्लीतील गुरुद्वारामध्ये झालं होतं. फक्त काही खास लोकांना या लग्नात बोलावण्यात आलं होते. 1 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.काही लोकांचं म्हणणं की नेहा लग्नापूर्वी गर्भवती झाली होती, त्यामुळे दोघांनाही घाईघाईत लग्न करण्याचं ठरवलं. मेमध्ये लग्न झाल्यानंतर तिने 18 नोव्हेंबर 2018 रोजी आपल्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर नेहाला खूप ट्रोल केलं गेलं. मात्र तिनं यावर कोणतंही उत्तर दिले नाही.

नेहाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ज्यात ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’, ‘शूट आउट एट लोखंडवाला’, ‘गरम मसाला’ सारख्या सर्वोत्तम चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी मिळाल्याचा आरोप, बिग बींच्या बॉडीगार्डची पोलीस आयुक्तांकडून बदली

83 Release date : 2021 मध्ये रणवीर-दीपिकाचा 83 रिलीज होईल का? कबीर खानने दिले हे उत्तर

Aai Kuthe Kay Karte : लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई…, संजनाचा वेडिंग लूक पाहिलात का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI