83 Release date : 2021 मध्ये रणवीर-दीपिकाचा 83 रिलीज होईल का? कबीर खानने दिले हे उत्तर

चित्रपटात रणवीर सिंह भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

83 Release date : 2021 मध्ये रणवीर-दीपिकाचा 83 रिलीज होईल का? कबीर खानने दिले हे उत्तर
2021 मध्ये रणवीर-दीपिकाचा 83 रिलीज होईल का? कबीर खानने दिले हे उत्तर
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:29 AM

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ च्या रिलीजबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तथापि, हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रणवीरच्या चाहत्यांना थोडासा धक्का बसू शकतो कारण त्यांना या चित्रपटासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटात रणवीर सिंह भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. (Kabir Khan reveals about Ranveer Singh and Deepika Padukone’s upcoming film 83)

कबीर खानचा मोठा खुलासा

खरं तर, भारतात, जवळजवळ सर्व राज्यांमध्ये अनेक चित्रपटगृहे उघडली आहेत. बऱ्याच काळापासून लॉकडाऊन अनेक अटींसह उघडण्यात आले आहे, परंतु महामारीच्या संकटामुळे लोक अजूनही तेवढ्या प्रमाणात चित्रपटगृहांमध्ये जात नाहीत, जेवढी चित्रपट निर्मात्यांना अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, ’83’ चित्रपटासाठी, चाहते अनुमान लावत होते की आता चित्रपटगृहे सुरु झाली आहेत, रणवीरचा चित्रपटही लवकरच दिसेल.

तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, जोपर्यंत देशभरातील प्रत्येकाला लसीकरण होत नाही आणि 100 टक्के चित्रपटगृहे सुरु होत नाहीत, तोपर्यंत प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

14 जूनला रिलीज होणार होता ’83’

क्रिकेटवर बनलेला हा चित्रपट 4 जून 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी इन्स्टाग्रामद्वारे चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी लिहिले की चित्रपटगृहांमध्ये आपणा सर्वांना भेटू पण महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी न मिळाल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली.

याचे कारण सांगितले जाते की या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेइतके मिळत नाही. कारण खूप कमी लोक चित्रपट पहायला जात आहेत. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत आणि असे म्हटले जात आहे की रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसला मालामाल करू शकतो. जे सध्याच्या परिस्थितीत निर्मात्यांना रिलीज करण्याचा धोका असल्याचे दिसते.

कबीर खान यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन

त्याचबरोबर पंकज त्रिपाठी, आर बद्री, एमी विर्क, साहिल खट्टर, निशांत दहिया, दिनकर शर्मा, चिराग पाटील, ताहिर राज भसीन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. प्रेक्षकांना चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये जिंकलेल्या विश्वचषक ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर बनविला गेला आहे. क्रिकेट आणि ग्लॅमरचे नातेही खूप जुने आहे. अशा स्थितीत जगभरात देशाचे नाव उंचावणारे अनमोल क्षण चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Kabir Khan reveals about Ranveer Singh and Deepika Padukone’s upcoming film 83)

इतर बातम्या

आरोग्य विभागाची गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली! आता परीक्षेची तारीख काय?

डीजीसीएने अडीच वर्षांनंतर हटवली बोईंग 737 मॅक्स विमानांवरील बंदी, या भारतीय विमान कंपनीला होईल थेट फायदा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.