AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात लाखो…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत होते. आता ई-केवायसी आणि पडताळणीनंतर अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात २.८३ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. चारचाकी वाहन, नोकरदार कुटुंब किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेच्या निरंतरतेची घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana:  लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात लाखो...
लाडकी बहीण
| Updated on: Mar 10, 2026 | 11:59 AM
Share

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास 2 वर्षांपासून दरमहा 1500 रुपये मिळतात.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलासांठी सरकारने या योजेनेची घोषणा केली आणि कोट्यवधी महिलांना त्याचा लाभ घेतला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. ई-केवायसीही बंधनकारक करण्यात आली आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात बीडमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दोन लाख 83 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. सुरुवातीला कुठलेही निकष न लावता किंवा नियमांचे काटेकोरपणे पालन न करता लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र आता अनेक निकष लावण्यात आलेले असुन काटेकोरपणे त्याचे पालन केले जात असल्याने बीड जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक महिलांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे एकूण 2 लाख 83 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर सुरुवातीला प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही 6 लाख 36 हजार इतकी होती. मात्र आता ही संख्या घटली असून ती एकदम 3 लाख 53 हजारांवर येऊन पोहोचली आहे. ज्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी आहे, ज्तसेच यांच्या घरात नोकरदार आहे, ज्यांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत आहे किंवा इतर शासकीय योजनेचा दरमहा लाभ घेतला जात आहे, अशा लाडक्या बहिणी आता या योजनेसाठी अपात्रठरत असून त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाहीयेत.

लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान गेल्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे यंदा मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. ‘ मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना अशीच सुरु राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे’ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

Follow Us
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...