AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्याचं काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उध्वस्त, तरीही हसत होता अभिनेता, कारण वाचून…

बॉलिवूडमधील 43 वर्षीय अभिनेता, ज्याचे काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उद्धवस्त, तरीही तो अभिनेता होता प्रचंड आनंदी. नेमकं कारण काय?

या अभिनेत्याचं काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उध्वस्त, तरीही हसत होता अभिनेता, कारण वाचून...
| Updated on: May 25, 2026 | 6:30 PM
Share

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे कुणाल खेमू. अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव आजही लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात.

विशेषतः त्याच्या बालपणाशी संबंधित एक धक्कादायक घटना अनेकांना आजही हादरवून टाकते. काश्मीरमधील अशांत काळात त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटाबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

लहान वयातच अभिनय क्षेत्रात प्रवेश

कुणाल खेमूने अतिशय लहान वयात कॅमेऱ्यासमोर काम करण्यास सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्याने अनेक चित्रपटांत काम केले आणि आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्यांनी मुख्य अभिनेता म्हणूनही बॉलिवूडमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कॉमेडीपासून इमोशनल भूमिकांपर्यंत प्रत्येक प्रकारात त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. अलीकडेच त्याची Abhay ही वेब सीरिजही चर्चेत होती.

कुणाल खेमूच्या वैयक्तिक आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. त्याने अभिनेत्री सोहा खानशी विवाह केला आहे. सोहा ही अभिनेता सैफ अली खानची बहिण आहे. 2015 साली दोघांचे लग्न झाले. या दाम्पत्याला इनाया नौमी खेमू नावाची मुलगी असून दोघेही सोशल मीडियावर आपल्या कौटुंबिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. चाहत्यांकडून त्यांच्या पोस्टला मोठी पसंती मिळते.

काश्मीरमधील बालपण आणि भीषण घटना

मात्र कुणाल खेमूचे आयुष्य नेहमीच इतके सुखकर नव्हते. तो एका काश्मीरी पंडित कुटुंबातून आला असून त्याचे बालपण श्रीनगर येथे गेले. 1989 पूर्वी त्याचे कुटुंब श्रीनगरमध्ये राहत होते. मात्र त्या काळात काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

एका मुलाखतीत कुणालने सांगितले होते की, त्या काळात झालेल्या एका स्फोटात त्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. त्या वेळी तो खूप लहान होता. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य त्याला समजत नव्हते. टीव्हीवर आपल्या उद्ध्वस्त घराची बातमी पाहिल्यानंतर तो घाबरण्याऐवजी आनंदी झाला होता. कारण त्याला वाटले की त्याचे कुटुंब टीव्हीवर दिसत आहे आणि तो आता प्रसिद्ध झाला आहे. ही एका लहान मुलाची निरागस भावना होती. मात्र त्या घटनेने त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा